क्राइम

मोबाईल मधून यशश्री च्या हत्ये मागचे सत्य येणार समोर 

Spread the love

नवी मुंबई  / नवप्रहार प्रतिनिधी 

                      उरण मध्ये घडलेल्या भयानक हत्याकांडाचा पूर्णतः उलगडा झाला नसल्याने तिच्या हत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस आपल्या परीने या प्रकरणाचा तपास करीत आहे. राज्याला हादरवून सोडणाऱ्या या हत्येतील एक महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे आता या हत्याकांडा मागील सत्य समोर येण्याची पोलिसांना आशा आहे.

काही दिवसांपूर्वी  उरण मध्ये यशश्री शिंदे या तरुणीची हत्या करण्यात आली होती. तिचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत निर्जन  ठिकाणी कोटणाका पेट्रोल पंपाजवल आढळून आला होता. तिचा कथित प्रियकर दाऊद याने तिची अत्यंत निर्दयपणे हत्या केली होती. आता यशश्री हीचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला आहे. पण तो पावसात भिजला असल्याने त्यातील डाटा काढणे कठीण झाले आहे. त्यासाठी पोलीस फॉरेन्सिक विभागाची मदत घेणार आहे. त्यामुळे यशश्री च्या हत्येमागील सत्य बाहेर येण्याची शक्यता बळावली आहे.

रांजनपाडा रेल्वे स्टेशन परिसरात यशश्रीचा मोबाईल पोलिसांना मिळाला. हा मोबाईल पाण्यानं भिजला आहे, त्यामुळे आता पोलीस ठाण्यात येऊन फॉरेन्सिक टीम या मोबाईलची दुरुस्ती करणार आहे. या मोबाईलमध्ये यशश्री आणि दाऊद यांच्यात झालेल्या संभाषणाचं रेकॉर्ड असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यशश्रीचा मोबाईल पूर्णपणे दुरुस्त झाल्याशिवाय त्यामध्ये काय आहे हे समजू शकणार नाही. सापडलेल्या मोबाईलच्या मदतीने या प्रकरणात आणखी काही गोष्टीचे खुलासे होण्याची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

काय घडले नेमके?
प्रेमात धोका मिळाल्याचा राग आणि सूडाने पेटलेल्या आरोपीनं यशश्रीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. यशश्री शिंदे भेटायला येत नसल्याने आरोपी दाऊद शेख चिडला होता. तिने लग्नाला नकार दिल्याने त्याच्या रागात भर पडली. सोबत येण्यासाठी तो तगादा लावत होता. त्याचा तगदा आणि सतत होण्याऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिने एकदा भेटून सगळा विषय संपवण्याचा निर्णय घेतला. आरोपी बदला घेण्यासाठी पूर्ण तयारीनं आला होता. तिथे त्यांच्यात वाद सुरू झाले आणि राग अनावर झाल्याने त्याने चाकूने सपासप वार केले आणि तिला संपवलं.हत्येच्या दिवशी यशस्वी ने तिच्या एका मित्राला फोन करून मदत मागितली मात्र नेटवर्क नसल्यामुळे दोघांचा संपर्क होऊ शकला नाही. हत्येनंतर दाऊद यशश्रीचा मोबाईल आणि हत्यार घेऊन कळंबोली येथून कर्नाटकची बस पकडून गावी निघून गेला. यानंतर पोलिसांनी आरोपी दाऊदला कर्नाटकमधून अटक केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close