सामाजिक

ट्रक ने घेतला अचानक पेट आणि ट्रक मधील चना झाला खाक 

Spread the love

सेलू / प्रतिनिधी

तुळजापूर –   बुटीबोरी महामार्गावर सेलडोह नाजिक चानात घेऊन जाणाऱ्या ट्रक ने अचानक पेट घेतल्याने ट्रक मधील चना जळूनी खाक झाला आहे. घटना मध्यरात्री 3.30 वा दरम्यान घडली आहे.

मराठवाड्यातील व्यापार्‍याचा 35 टन चणा घेऊन एम. एच. 26/बी. ई. 9511 क्रमांकाचा ट्रक मध्यप्रदेशात जात होता. रात्री अंदाजे साडे तीनच्या दरम्यान ट्रक सेलडोह येथील उड्डाण पुलावर चढताच ट्रकने अचानक पेट घेतला. चालक केशव सुरसेटवार व वाहक कृष्णा बुचुंडे यांनी प्रसंगावधान दाखवत ट्रकमधून उड्या मारल्या. त्यांनी पोलिसांच्या 108 क्रमांकावर घटनेची माहिती दिली. दरम्यान पत्रकार माणिक देडे व पोलिस पाटील योगराज कौरती यांनी सिंदीरेल्वे पोलिस आणि नगर पालिका सिंदीच्या अग्निशमन दलास सूचना केली. परंतु, रात्रीचा प्रहर असल्यामुळे अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहचण्यास विलंब झाला. तेवढ्या वेळेत ट्रक व चणा जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच बिट जमादार हरणे व सहकारी मंडळींनी पंचनामा करुन वाहन अन्यत्र हलवून मार्ग मोकळा केला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close