हटके

ती टॉवेल वर घराबाहेर पडली आणि मग रस्त्यावर टॉवेल ही फेकून दिला

Spread the love

नवी दिल्ली  / नवप्रहार डेस्क 

                   प्रसिद्धीचा ध्यास सगळ्यांनाच असतो. प्रसिध्दी साठी लोक काही देखील करायला तयार असतात. सध्या तर डिजिटल युग आहे. या युगात प्रसिध्दी साठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्म वर प्रसिध्दी मिळवण्यासाठी लोक कुठल्याही स्तरावर जातात. प्रसिध्दी साठी एक तरूणी चक्क टॉवेल वर घराबाहेर पडली आणि रस्त्यावर आल्यावर तिने टॉवेल ही काढून फेकले. 

सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओ टाकणाऱ्या वर कॉमेंट्स करतात. त्यात  लोकांवर अश्लील कमेंट करून टीकाही करतात. पण त्यांना बहुधा पर्वा नसते. अशा परिस्थितीत केवळ लोकप्रियता मिळविण्यासाठी हे सर्व करणं योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.

आज आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत तो पाहिल्यानंतर तुम्हालाही राग येईल. कारण व्हिडीओमध्ये एक मुलगी टॉवेल गुंडाळून घराबाहेर पडली असून लोक तिच्याकडे बघत आहेत. मात्र, शेवटी तिने ड्रेसवर टॉवेल घातल्याचं समोर आलं आहे. टॉवेल गुंडाळून मुंबईच्या रस्त्यांवर निर्भयपणे फिरणाऱ्या या तरुणीचं नाव तनुमिता असून ती मिंत्रा फॅशन सुपरस्टारची विजेती आहे. इन्स्टाग्रामवर तनुमिताला 37 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. तनुमिताचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ती बाथरूममधून आंघोळ करून थेट रस्त्यावर आल्याचं दिसतं.

व्हिडिओमध्ये ती टॉवेल गुंडाळून रस्त्यावर चालताना दिसते. तिने कानात झुमके घातले आहेत. तर पायात स्पोर्ट्स शूज घातले आहेत. रस्त्यावरून जाणारे लोक तिच्याकडे एकटक पाहत आहेत. ती बसस्थानकावरून दुकानाकडे जाते आणि मध्येच सोसायटीसमोरच्या बाकावर बसते. मग ती अचानक धावत चार मुलांसमोर जाते आणि आपल्या केसांचा टॉवेल काढून त्यांच्यासमोर फेकून देते. मग अंगावर गुंडाळलेला टॉवेल काढून फेकून देते. तेव्हा सत्य समोर येतं. खरं तर , टॉवेलच्या आत तिने एक सुंदर ड्रेस घातला आहे. लिंकवर क्लिक करून पाहू शकता व्हिडीओ.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्याला आतापर्यंत 10 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर हजारो लोकांनी त्याला लाईक आणि शेअर केलं आहे. अनेक कमेंट्सही आल्या आहेत. तनुमिताच्या या व्हिडिओवर बहुतांश लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना सिमरन नावाच्या मुलीने लिहिलं आहे की, हे हॉलिवूड टाईप प्रँक्स इथे चालत नाहीत. तर पुजेश्रीने कमेंट केली आहे की, मला असंच काहीतरी करावं लागेल, कारण माझे होत नाहीत. याशिवाय इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close