चोरट्यांनी केला शनी मंदीरातील चांदीचा मुकुट व छत्री लंपास
अचलपूर प्रतिनिधी- किशोर बद्रटिये : – अचलपूर शहरातील चावलमंडी बिलनपुरा येथील प्रसिद्ध श्री शनि मंदिरामध्ये आज 14 नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी महाराचा मुर्ती चांदीच्या मुकुट लंपास केल्याची घटना उघडीस आल्याने खळबळ उडाली आहे .
प्राप्त माहितीनुसार अचलपूर शहरातील प्रसिद्ध असलेल्या श्री शनी मंदिरामध्ये शनि महाराजां चा दीड किलो वजनाचा दोन चांदीचे छत्र व मुकुट अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे .
अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी मंदिर असल्याने याठिकाणी चोरट्याने हात सफा केल्याने शहरात संताप निर्माण झाला आहे .यापूर्वीही शहरातीलच प्रसिद्ध कार्तिक स्वामी मंदिरामध्ये देखील कार्तिक स्वामीची मुकुट चोरून नेल्याची घटना घडली होती . चोरटे जणू मंदिरांना टारगेट करत असल्याचे दिसुन येत असुन घटनेचा तपास अचलपूरचे पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे करत असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्या जात आहे शहरात पंधरा दिवसात दोन ठिकाणचे मुकुट चोरी गेल्याने पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे .