अनाथ मुलीचे पालकत्व स्वीकारून ठाणेदारांनी दिला माणुसकीचा परिचय
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
कु माही राजेश मसराम वय 7 वर्ष शाळा जि. प.पुर्व माध्यमिक शाळा वरुड बगाजी ता धामणगाव रेल्वे या मुलीचे आई वडीलाचा अपघातात मृत्यू झालेला असून ती आपल्या आजी पासी एकटीच राहते सदर मुलगी अनाथ असून आज रक्षाबंधनाच्या दिवशी रक्षाबंधन निमित्त कार्यक्रमात मंगरुळ दस्तगीर चे ठाणेदार मा श्री पंकज जी दाभाडे साहेबांना माहिती सांगण्यात आली त्यानंतर ठाणेदार मा श्री पंकज जी दाभाडे साहेब व पोलीस उपनिरीक्षक मा श्री विनोद जी वासेकर साहेब यांनी कु. माही राजेश मसराम या मुलीचे शिक्षणाचा खर्च एक वर्षासाठी ते करणार म्हणून जबाबदारी घेतली व सुकन्या योजनेच्या प्रक्रिया मध्ये पूर्णपणे पाठपुरावा सुरू करु हे पण जबाबदारी घेतली ठाणेदार मा श्री पंकज जी दाभाडे साहेब उप निरीक्षक विनोद जी वासेकर साहेब आपल्या दोघाना यांच्या कार्याला मी मानाचा मुजरा करतो साहेब तुम्ही सर्वात मोठे कार्य करत आहे.