Uncategorized

राज ठाकरे गरजले सत्तेत आल्यावर मशिदीवर भोंगा लागणार नाही आणि .….

Spread the love

मुंबई / नवप्रहार डेस्क .

              मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या बिनधास्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना जे बोलायचे ते जगाची पर्वा न करता बोलून चूकतात . आज केलेल्या भाषणात त्यांनी मुंबईतील टोल नाके आणि मशिदीवरील भोंगे आणि रस्त्यावर नमाज पठणाच्या विषयाला हात घातला. ते म्हणाले की मुंबईतील  सगळे टोल नाके बंद झाले आहेत. त्याबद्दल कोणीही बोलत नाहीत. इतर कोणत्याही राजकीय पक्षाने या मुद्दा उचलला नाही. कारण सगळ्यांचे हात त्या टोलमध्ये अडकले होते

सत्तेत नसताना आम्ही अनेक विषय मार्गी लावल्याचे राज ठाकरे म्हणाले. पुढच्या दोन दिवसात पक्षाचा जाहीरनामा येणार आहे. त्यामध्ये एक गोष्ट म्हणजे आमची सत्ता आल्यास राज्यातील एकाही मशिदीवर भोंगा ठेवणार नाही असे राज ठाकरे म्हणाले. रस्ते अडवून पाडले जाणारे नमाज बंद करणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंचं सरकार असताना आम्ही मशिदीवरील भोंगे आम्ही बंद केले. यावेळी 17000 महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीतर आम्ही सांगितलं होतं, की त्यापुढे हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले. पुण्यात एका मुस्लिम पत्रकाराने सांगितले की, तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे. मशिदीवर भोंगे काढण्याचा तुमचा निर्णय योग्य असल्याचे त्या पत्रकाराने सांगितल्याचे राज ठाकरे म्हणाले.

मनसेनं ज्या गोष्टी केल्यात त्या कायमस्वरूपी आहेत

सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. यामुळं लोकांची लक्षात ठेवण्याची ताकद कमी झाली असल्याचे राज ठाकरे म्हणाले. पण मनसेनं ज्या गोष्टी केल्यात त्या कायमस्वरूपी आहेत असेही राज ठाकरे म्हणाले. रेल्वे भरतीसाठी मनसेनं आंदोलन केलं, कारण इथल्या नोकऱ्या बाहेरच्या राज्यातील तरुणांना दिल्या जात होत्या.या परिक्षांची इंथ जाहिरात दिली जात नव्हती, याला जबाबदार कोण? असा सवालही राज ठाकरेंनी केला. इथून दिल्लीत जाणाऱ्या खासदार मंत्र्यांनी काय केलं? यावर संसदेत का कुणी बोललं नाही? असा सवाल राज ठाकरेंनी केला. जर हे महाराष्ट्राच्या उपयोगीच पडणार नसतील तर का निवडून द्यायचं यांना? असा सवालही त्यांनी केला.

मनसेमुळे आज मुंबईच्या दुकानांवर मराठी पाट्या दिसतायेत

मनसेमुळे आज मुंबईच्या दुकानांवर मराठी पाट्या दिसत आहेत असे राज ठाकरे म्हणाले. मोबाईल फोन कंपन्यांना दणका दिला, तेव्हा संदेश मराठीतून आले. मशिदींवरच्या भोग्यांसमोर हनुमान चालिसा लावली, त्यामुळं भोंगे वाजणे बंद झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. मशिदींवरच्या भोग्यांबाबत 17 हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाल्याचे ते म्हणाले. अनेक मुसलमानांनीही भोग्यांच्याविरोधात मनसेचं कौतुक केलं. तेव्हा सरकारनं साथ दिली असती तर आज राज्यात एकाही मशिदीवर भोंगा राहिला नसता असेही राज ठाकरे म्हणाले.

सगळ्या शहरांचा विचका झालाय

ज्यावेळी आंदोलन केलं, त्यावेळी प्रत्येक आंदोलन तडीस नेल्याचे राज ठाकरे म्हणाले. सगळ्या शहरांचा विचका झालाय, त्याचे परीणाम आपण सोसतोय असेही राज ठाकरे म्हणाले. आम्ही महाराष्ट्राचा विकास आराखडा समोर आणला आहे. 2006 ते 2014 कुठेही गेलो की प्रश्न विचारला जायचा की तुमच्या ब्लू प्रिंटचं काय झालं? असेही राज ठाकरे म्हणाले

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close