सामाजिक

त्रिकोणी प्रेम प्रकरणातील आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी

Spread the love

 

कोरंभी सालेबर्डी. जवळील नाल्यात आढलुन आलेल्या नयन मुकेश खोडपे खून प्रकरण 

 १९ वर्षीय तीन आरोपी यात दोन मुले तर एक मुलगी जेरबंद

भंडारा/जवाहरनगर :त्रिकोणी प्रेम प्रकरणातून नयन मुकेश खोडपे वय १९ वर्ष रा. पांढराबोडी ( भंडारा) यांचा तीन मित्राने काटा काढून गळा आवळून खून केल्याचे सिद्ध झाल्याने तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या तिन्ही आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी भंडारा न्यायलयाने दिली असल्याने या खून प्रकरणातील आणखी नवीन पुरावे किंवा पुन्हा आरोपित्त वाढ होऊ शकते का? त्या दिशेने जवाहरनगर पोलीस तपास करीत आहेत. 

त्रिकोणी प्रेम प्रकरणातून आरोपी सोबत मृतक नयन याचे पंधरा दिवसांपूर्वी पांढराबोडी गाव शिवारालगत भांडण झाले होते.या भांडणातून प्रेमात आडवा का आलास हा संशय ठेऊन मुख्य आरोपी मंथन अशोक ठाकरे वय १९ वर्ष रा.भोजपुर याने मित्र साहिल शरद धांडे वय १९ रा.ठाणा पेट्रोल पंप व पुनम नरेन्द्र कारेमोरे वय १९ रा. बीड सितेपार या तिघांनी नयन ला प्रेमात आदवणाला म्हणून काटा काढण्यासाठी पुनम हीची मदत घेऊन.पुनम ने दिनांक २७ नोव्हेंबर च्या सकाळी नयन ला फोन करून भंडारा येथे बोलावून घेतले. तिथून पुनम व नयन एकच मोटासायकलनी क्रमांक एम.एच.४० ए. ए.४१२४ ने 

 जवाहरनगर परिसरातील नांदोरा झिरी येथे आले.खूप वेळ एका झाडा खाली दोघांनीही वेळ घालवली.त्यानंतर मागाहून मंथन व साहिल हे दोघेही एका मोटार सायकलनी नांदोरा झिरी येथे येऊन नयन सोबत मंथन व साहिल यांनी भांडण केले .या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होऊन पुनम समोर दोघांनी नयन ला झाडाला बांधून बेदम मारहाण करून हिरव्या कापडाने जीव जाई पर्यंत गळा आवरला. आता नयन मृत झाला हा विश्वास घेऊन नयन व त्याची मोटासायकल तिथेच ठेऊन एकाच मोटासायकलनी सालेबर्डी मार्ग भंडारा कडे पळाले.

त्याच रात्री नशा करून पुन्हा मंथन व साहिल दोघेही एकाच मोटासायकलनी सालेबर्डी मार्ग

मृतक नयन ला मारहाण करून गळा आवरून ठार केले त्या ठिकाणी येऊन खरंच नयन मेला का ? की जिवंत आहे याची शास्वती करण्यासाठी आले .मृतक नयन हा खरच जिवंत नाही आहे हे पटले तेव्हा या दोघा आरोपींनी पुन्हा हिरव्या कापडाने गळा आवरून, कापडाच्या सहायाने हात पाय बांधून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने सालेबर्डी जवळील पंडित नाल्यातील लहान पुला नाजिकच्या गोसे धरणाच्या बॅक वॉटर पाण्यात फेकून दिले. त्याच रात्री पुन्हा नांदोरा झिरीच्या त्या घटना स्थळी येऊन मृतक नयन ह्याची मोटासायकल सोबत घेऊन, ती मोटासायकल भंडारा तहसील कार्यालय जवळील मोडक्या इमारतीजवळ फेकून दिली .फिर्यादी मृतकाचे भाऊ व नातेवाईकांनी सुरुवातीलाच मंथनवर संशय व्यक्त केला.त्या दिशेनी.पोलिसांनी मंथन याला ताब्यात घेऊन तपासात घेतले असता या कट्टात माझे सोबत मृतक नयन याचा चुलत भाऊ अक्षय खोडपे रां.हनुमान. वॉर्ड पांढराबोडी हा असल्याचे पोलिसांना कबुली जबाबात उल्लेख केला असल्याने पोलिसांनी त्याला तपासात घेतले असता.अक्षय हा या कट्टात सामील नसल्याचे जेव्हा सिद्ध झाले तो पर्यंत पोलिसांनी साहिल व पुनम हे यातील आरोपी असल्याने त्यांना ताब्यात घेऊन 

भंडारा न्यायालयात हजर करून ,न्यायालयायाने जवाहरनगर पोलिस यांना पुढील तपासाकरिता पाच दिवसांची पोलीस कोठडी रिमांड दिले असल्याने या खून प्रकरणाचा 

शोध घेण्यास मदत होईल या तपासात जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतांनी, अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मीता राव, जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा भंडारा नितिन चिंचोळकर यांचे मार्गदर्शनाखाली जवाहरनगर पोलिस स्टेशन ठाणेदार सुधिर बोरकुटे गुन्हा ३०५/२३ कलम ३०२,२०१ दाखल करून तपास करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close