क्राइम

शिक्षका कडून होणाऱ्या लैंगिक छळाला कंटाळून विद्यार्थ्याने केली शिक्षकाची हत्या

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया 

                  समलैंगिक शिक्षकाकडून होणाऱ्या लैंगिक छळामुळे त्रासलेल्या विद्यार्थ्याने (14) शिक्षकाची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  विद्यार्थ्याने कटर ने शिक्षकाच्या मानेवर वार करून त्याची हत्या केली आहे.  पोलिसांनी याप्रकरणी मुलाला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय शिक्षक वारंवार मुलाशी गैरवर्तन करत होता. मुलासोबत केलेल्या गैरकृत्याचा शिक्षकाने व्हिडीयो तयार केला होता. या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करुन शिक्षक मुलावर वारंवार अत्याचार करत होता. मात्र संयमाचा बांध सुटल्यानंतर विद्यार्थ्यांने बदला घेण्यासाठी धारदार शस्त्राचा वापर करून शिक्षकाची हत्या केली. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीत 30 ऑगस्ट रोजी दुपारी जामिया नगर येथील बाटला हाऊसमधील घराच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीबाहेर रक्त बाहेर येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

मृत शिक्षकाच्या मानेवर खोलवर जखमा असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले. शिक्षक आपल्या कुटुंबासह झाकीर नगर येथे राहत होता. प्राथमिक तपासात, शिक्षक समलैंगिक होता आणि दोन महिन्यांपूर्वी त्याने त्या मुलाची भेट घेतली होता. त्यानंतर तो सातत्याने त्याचे लैंगिक शोषण करत होता. व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी तो मुलाला देत होता. घटनेच्या दिवशी शिक्षकाने मुलाला जामिया नगरच्या घरी भेटायला बोलवले होते. त्यावेळी मुलगा पूर्ण तयारीनिशी तेथे दाखल झाला. त्याने घरी पोहोचताच पेपर कटरने शिक्षकांच्या मानेवर वार केला. या हल्ल्यात शिक्षकाचा मृत्यू झाला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close