क्राइम

विद्यार्थिनीने केले शिक्षकावर आरोप पण आरोपी निघाला दुसराच 

Spread the love

वर्धा  / प्रतिनिधी 

                        खाजगी शिकवणी साठी जाणारी अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती झाल्याने शिक्षका विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. पोलीस विभागाने डीएनए चाचणी केल्यावर शिक्षक गर्भात असलेल्या बाळाचा पिता नसल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर भलतेच सत्य बाहेर आले.

डीएनए चाचणीत विद्यार्थिनी प्रियकरामुळे ती गर्भवती झाल्याचे पुढे आल्याने प्रियकराला १० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली असून तन्वीर शहा गुलाम शहा (वय-२४) असे त्याचे नाव आहे. तर शिकवणीच्या शिक्षकाला मात्र निर्दोष मुक्त करण्यात आले. हा निकाल जिल्हा न्यायाधीश एस. ए. एस. एम. अली यांनी दिला.

घटनेची थोडक्यात हकिगत अशी की, पीडिता ही एका खासगी शिकवणीला जात होती. त्या दरम्यान तेथील शिक्षकाकडून ती गर्भवती झाल्याची तक्रार पीडितेने पोलिसात दिली. पोलिसांनी तपासादरम्यान पीडिताच्या गर्भाचे व शिक्षकाचे डीएनए नमुने तपासणीकरिता पाठविले. त्यात संबंधित शिक्षक हा तिच्या गर्भातील बाळाचे वडील नसल्याचे पुढे आले.

त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी पीडितेची कसून चौकशी केली असता तिचे तन्वीर शहा गुलाम शहा याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे तिने कबूल केले. त्यामुळे तन्वीरला ताब्यात घेऊन त्याचा डीएनए नमुन्याची तपासणी केली असता तोच पीडितेच्या गर्भातील बाळाचा बाप असल्याचे पुढे आले.

साक्षीपुराव्यादरम्यान पीडितेने शिक्षकाविरोधात साक्ष दिली; परंतु तन्वीरला ओळखत नसल्याचे सांगितले. दरम्यान तन्वीरचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने नाकारला होता. सदर प्रकरणात सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी केला. त्यांना या प्रकरणात अॅड. स्वाती एस. गेडे (दोडके) यांनी मदत केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close