क्राइम

लग्न आणि प्रॉपर्टी साठी ती जिद्दीला पेटली ; हीच गोष्ट तिला नडली

Spread the love

पालघर / नवप्रहार मीडिया 

मागील आठवड्यात मोखाडा येथील वैतरणा नदीपात्रात मागील आठवड्यात शिर नसलेलं एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणात पालघर पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रॉपर्टी च्या वादातून आणि लग्नाच्या तगादयामुळे संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीची गळा चिरून हत्या केली आहे.

पालघरमधील मोखाडा येथील वैतरणा नदीपात्रात मागील आठवड्यात शिर नसलेलं एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणात पालघर पोलिसांकडून धक्कादायक माहिती उघड  करण्यात आली आहे. आपण नक्की काय घडलंय, ते सविस्तर जाणून घेऊ या.

 

 

प्रेयसीला संपवण्याचा निर्णय

सोलापूरमधील सुनील यादव याचं एका महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. मात्र, ही महिला सुनीलला वारंवार लग्न करून प्रॉपर्टी आपल्या नावावर करण्याची जबरदस्ती करत होती. अखेर सुनील (Boyfriend killed Girlfriend) या प्रकारामुळे प्रचंड वैतागला अन् त्याने प्रेयसीला संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने मित्राची मदत घेतली आणि योजना आखली.

लोणावळ्याला जाऊ असं सांगत या दोन्ही आरोपींनी मृत तरूणीला गाडीत बसवलं अन् घटनास्थळी आणलं. आरोपी सुनील यादव याने आपला साथीदार महेश बडगुजर याच्या मदतीने प्रेयसीची हत्या केली. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तिचं मुंडक शरीरापासून वेगळ केलं. तो मृतदेह वैतरणा नदीत फेकून दिला होता.

प्रेमप्रकरणातून हत्या हा नित्याचा प्रकार –

मृतदेह सापडल्यानंतर पालघरच्या मोखाडा पोलीस ठाण्यात कलम 302 आणि 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी पोलीस तपास करत असताना हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आलं आहे . आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. प्रेमप्रकरणातून अनेकदा हत्या झाल्याच्या घटना घडतात. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये देखील अशा घटना घडल्याचं पाहायला मिळतं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close