तोतया पत्रकारामुळे खऱ्या पत्रकारांची प्रतिमा डागाळतेय

अधिकारी देखील हैराण
एक न अनेक तोतया पत्रकार म्हणुन मिरवतात.
वरिष्ठांणी दखल घेण्याची मागणी.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
सध्या सोशल मिडिया व इतरही अनेक माध्यमांतून एखादी घटना घडली की पटकन ती दूसऱ्या पर्यंत अर्धवट माहिती लेखणीतून पोहचवली जाते.अशाच लेखणीचा वापर करत पत्रकारीतेचा ‘प’ न कळणारे ही पत्रकार म्हणून वापर करत तोतया पत्रकार बनून समाजात मिरवणाऱ्या चे प्रमाण वाढले असून अशा बोगस स्वयंघोषित ‘कॉपी पेस्ट’ पत्रकारी करणाऱ्या मुळे खऱ्या जनतेच्या समस्या व भ्रष्टाचार विरोध करुन अधिकारी वचक ठेवत जनता आणि प्रशासन यात समन्वय साधून भ्रष्टाचार मुक्त समाज निर्माण करण्यासाठी तळागाळात जाऊन खऱ्या वृत्तांकन माध्यमातून उजाळा देणाऱ्या पत्रकारितेला उतरण लागल्याचं दिसतं आहे.काही तोतया पत्रकारकडे ज्या वृत्तपत्राच ते नाव सांगतात त्याचे कुठलेही लिखीत पत्रकारिता पत्रक व ओळखपत्र तर नाहीच पण साधं बातमी वृत्तांकन ते करत नसून केवळ कॉपी पेस्ट कार्यक्रम चालवतात. अधिकारी व ईतर व्यावसायिक यांचे पासून अर्धी ढकलत गर्दी कार्यक्रम सुरू असून अशा तोतयामूळे अधिकारी व जनता जनार्दन यांचे मनात खऱ्या वृत्तांकन करून जनतेचा आवाज बनत भ्रष्टाचार आळा घालणारी पत्रकार मुस्कटदाबी होत आहे. पत्रकारिता ही तोतया कडून केवळ वसिलेबाजी करण्यासाठी व आपले गोरखधंदा राजरोसपणे सुरू ठेवण्यासाठी केली जात असून अशांचा वरिष्ठांकडून बंदोबस्त केला जावा ही मागणी आता जनता जनार्दन व वसिले देतादेता त्रस्त झालेले अधिकारी यांचेतून होत आहे. शिवाय तोतया पत्रकारास कुणी न घाबरता सरळ पत्रकार म्हणून वसलेली करत असल्यास त्याची माहिती पोलिसत द्यावी व अशा वसिलेगाराची भांडाफोड करावी हेही जनतेच्या तोडून येत आहे. वरिष्ठाणीही खऱ्या लेखणीकरणाऱ्या व आपल्या वृत्तपत्रात काम करणाऱ्या पत्रकारांची नोंद ठेवत अशा तोतयामूळे पत्रकार बदनाम होणार नाही ह्यावर लक्ष पुरविणे ही तितकेच गरजेचे आहे.