सामाजिक

राज्य सरकारने शिवरायांच्या वाघनखा संदर्भात सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी – आ. रणधीर सावरकर

Spread the love

 

अकोला / नवप्रहार डेस्क

अवघ्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे राष्ट्रीय महापुरुष आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली व लंडन येथील संग्रालयात असलेली वाघनखे हे महाराष्ट्रासाठी शौर्याचे प्रतिक असून महाराष्ट्राची अस्मिता या वाघनखांशी जोडली असल्याकारणाने ही वाघनखे लंडन येथील विक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट संग्रालयातून राज्यातील समस्त जनता व शिवप्रेमींसाठी राज्यात आणण्याकरिता शासनाने प्रयत्न केलेले आहे.
लंडन मधून आणली जाणारी वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे नाहीत असा दावा इतिहास संशोधक श्री.इंद्रजीत सावंत यांनी दोन दिवसापुर्वी (८ जुलै २०२४) पत्रकार परिषदेतून केलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे राज्यात आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने सन २०२२ पासून सुरु केलेला आहे. सदर वाघनखे राज्यात आणण्याकरिता प्रतिनिधी मंडळ लंडन येथे जाण्यापुर्वी दोन दिवस अगोदर श्री. इंद्रजीत सावंत लंडन मधून आणली जाणारी वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे नाहीत असा दावा पत्रकार परिषदेमधून केला होता. यापुर्वी दोन वर्षात मात्र त्यांनी अशा प्रकारचा कोणताही दावा केलेला नव्हता. श्री. इंद्रजीत सावंत हे शिवप्रेमींच्या भावनांशी खेळत असून राज्यामध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण करीत असतात. श्री. इंद्रजीत सावंत यांच्या या दाव्याचे यापुर्वी खंडन सुद्धा करण्यात आलेले आहे. श्री. इंद्रजीत सावंत यांच्या या दाव्याचे शासनाने खंडन करुन राज्यातील जनतेसमोर तातडीने वस्तुस्थिती आणावी अशी मग मागणी भाजपा प्रदेश सरचिटणीस आणि अकोला पूर्वचे अभ्यासू आमदार रणधीर सावरकर त्यांनी आज विधिमंडळात करून शिवप्रेमी शिवभक्त यांच्या भावना व्यक्त केल्या आहे
यासंदर्भात सांस्कृतिक वनमंत्री नामदार सुधीर मनगुंटीवार यांनी सांगितले की नेक संशोधकार्‍यांनी या नखा बद्दल माहिती दिली आहे तसेच अनेक शिवप्रेमींनी या संदर्भात मागणी केली होती त्यामुळे 20 नोव्हेंबर 202२” पासून आपण सातत्याने याच्या प्रयत्नशील होतो व्हिक्टोरिया संग्रहालयाने एक वर्षासाठी दर्शनासाठी व अफजलखानाचा शिवाजी महाराजांनी केलेल्या नखाच्या माध्यमातून केलेल्या वादाचा नख जनतेला माहिती व्हावी यासाठी व्हिक्टोरिया संग्रहालय देण्याची मान्य केले आहे परंतु सातत्याने शिवप्रेमी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या प्रयत्नामुळे तीन वर्षासाठी हे नको महाराष्ट्रात येत असून राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज व सातारा येथील संग्रहालयामध्ये 19 जुलै रोजी हे नख ठेवण्यात येणार असून यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्याचा आरोप खोटा असून 14 लाख रुपये खर्च आला आहे असेही यावेळी नामदार सुधीर मुनगुंटीवार यांनी सांगून छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय महापुरुष होते त्यांच्याविषयी असलेली श्रद्धा विश्वास व त्यांनी केलेले काम हे आजारावर असून विरोधी पक्षाने सुद्धा या कार्याला मदत केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले केवळ एका संशोधक या विषयी. प्रश्न उपस्थित केला आहे परंतु शिवप्रेमी आणि शिवभक्त यांनी रायगड वर असलेली अतिक्रमण काढण्यासंदर्भात केलेली कारवाई व या नखामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास नवीन पिढीला व त्याकालीन संस्कृतीचा परिचय या माध्यमातून घडणार असून पत्रकार परिषद च्या माध्यमातून याचे उत्तर देऊ शकलो असतो परंतु सभागृहाला माहिती मिळावी यासाठी आपण या संदर्भात अनेक पुरावे संशोधनकारक अनेक शिवप्रेमी यांनी दिल्यामुळे आपण हा प्रयत्न केल्याचे यावेळी नामदार मुनगुंटीवार यांनी सांगितले व सर्व शिवप्रेमी शिवभक्तांनी या सातारा संग्रहालयामध्ये ठेवण्यात येणाऱ्या नख दर्शनासाठी व नखं पाहणीसाठी यावे याचं आमंत्रण त्यांनी दिले
आमदार रणधीर सावरकर यांनी या महत्त्वाच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधून सरकारला सभागृहामध्ये माहिती देणे साठी प्रेरित केले व सरकारने सविस्तर माहिती देऊन भ्रम निर्माण करणाऱ्यांचा प्रयत्न विषयी उत्तर दिले

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close