१ लाखाची लाच घेताना सचिव आणि संगणक चालक एसीबी च्या जाळ्यात

यावल/ नवप्रहार मीडिया
लाच घेणे आणि देणे हा गुन्हा आहे. असे वारंवार सांगून देखील वरकमाईच्या लालचेपायी शासकीय कर्मचारी पैशाची मागणी करतात आणि पकडले जातात.सोबत च्या व्यक्तीवर कारवाई, नंतर कारावास आणि कोर्ट मॅटर त्यामुळे त्याला होणारा मानसिक त्रास याची सगळ्यांना जाणीव असते. पण यानंतर सुद्धा ते लाच घेणे सोडत नाही. लाच घेताना सचिव आणि संगणक चालक एसीबी च्या कारवाईत अडकले आहेत.ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी रा.साकळी ता.यावल आणि ऑपरेटर सुधाकर धुडकू कोळी (वय-३५) रा. चुंचाळे ता.यावल असे लाचखोर संशयित आरोपींची नावे आहेत
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील चुंचाळे गावात राहणारे तक्रारदार यांच्या वडिलांची नावे एक संस्था आहे. यातून या संस्थेच्या माध्यमातून १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीमधून गावात शिलाई मशीन प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागातील महिला व युवतींना स्वावलंबी करण्याच्या योजनेसाठी केंद्र शासनाकडून २ लाख रुपये निधी मंजूर झाला होता.
या मंजूर झालेल्या निधीची ५० टक्के क्कम म्हणजे १ लाख देण्याची मागणी चुंचाळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी यांनी केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार दिली.
दरम्यान विभागाने तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या पडताळणीसाठी शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता वाजेच्या सुमारास सापळा रचला. ग्रामसेवक हेमंत जोशी यांनी सांगण्यावरून ग्रामपंचायत ऑपरेटर सुधाकर धुडकू कोळी यांनी १ लाख रुपयांची रक्कम घेतली. तेवढ्यात जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने ऑपरेटरला पैसे घेताना रंगेहात पकडले. दरम्यान याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सदरची कारवाई पोलीस उपअधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील,स.फौ.सुरेश पाटील, पो.ना. बाळू मराठे, सुनिल वानखेडे, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर ,पो.ना.किशोर महाजन,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ,पो. कॉ.प्रणेश ठाकुर, पो. कॉ. अमोल सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.