क्राइम
सरपंचाच्या खोट्या स्वाक्षऱ्या करत सचिवाने बँकेतून केली 31 लाखांची उचल

सचिवाला ऑनलाइन जुगार खेळण्याचा नाद असल्याने तो जुगारात रक्कम हरल्याची चर्चा
आता तो म्हणतो माझ्या कडून चूक झाली
भंडारा ( प्रतिनिधी)
काही वाईट सवयी अश्या आहेत ज्या माणसाला जडल्या तर त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा सत्यानाश झाला समजा. ज्यात बाई, बाटली आणि जुगाराचा समावेश होतो. ऑनलाइन जुगाराचा नाद असलेल्या ग्रांम सेवकाने ग्राम पंचायत च्या खात्यातील रक्कम सरपंचाची खोटी सही मारत उचलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. तर पाच ग्रा.पं. सदस्यांनी याबाबत जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल करत चौकशी ची मागणी केली आहे.
मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बुज आणि खडकी ग्रा.पं. चा पदभार असलेल्या ग्रामसेवक राकेश वैद्य याला ऑनलाइन जुगाराचा नाद होता. हा सुरवातीला पगाराची काही रक्कम जुगारात हरला. ती कव्हर करण्यासाठी त्याने मित्रमंडळी कडून काही रक्कम हात उसने घेतली. तो ती देखील हरला. त्यानंतर त्याने देव्हाडा बूज आणि खडकी ग्राम पंचायत च्या खात्यातील रक्कम सरपंच आणि गटविकास अधिकाऱ्याच्या खोट्या साह्य मारून काढली.
असा झाला प्रकरणाचा भांडाफोड – देव्हाडी बूज ग्राम पंचायत च्या खात्यात साईबाबा मंदिर च्या भिंतीच्या बांधकामाचे 19 लक्ष, घर टॅक्स चे मिळून 29 लाख रु.जमा होते. त्यापैकी 28 लाख 40 हजार रुपये सरपंचाची बनावट स्वाक्षरी करून उचल केले. तसेच पाणीपुरवठा फंडातून 50 हजार रुपये, तर अमानत फंडातून 78 हजार रुपयांची उचल केली. तसेच खंड विकास अधिकारी यांचे संयुक्त खाते असलेल्या दलितवस्ती सुधार फंडातील 1 लाख 3 हजार रुपयांपैकी एक लाख रुपयांची उचल केली. या भिंतीच्या कामासाठी लागणारे साहित्य ग्राम पंचायत ने ज्या दुकानदारा कडून खरेदी केले होते त्याला त्या मोबदल्यात चेक दिला होता. चेक बँकेतून न वटल्याने दुकानदाराने ही बाब सरपंचाला सांगितली. तेव्हा या कृत्याचा भांडाफोड झाला.
पासबुक बद्दल विचारणा केली असता काही न काही कारण सांगून वेळ मारून न्यायचा – सरपंच आणि उपसरपंचांनी बँकेच्या पासबुक बद्दल विचारणा केलीं असता तो पास बुक घरी विसरलो. किंवा अन्य कारण सांगून वेळ मारून न्यायचा.
सरपंच आणि गट विकास अधिकाऱ्यावर वर्तविला संशय – या प्रकरणाची तक्रार पाच सदस्यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यपालन अधिकारी जी.प. यांच्याकडे केली असून यात सरपंच आणि गट विकास अधिकारी यांची मिलीभगत तर नाही ना अशी शंका व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे.
.माझ्या कडून चूक झाली – ग्राम सेवक राकेश वैध याला याबद्दल विचारणा केली असता त्याने आपली चूक मान्य करत माझ्या कडून चूक झाली अशी कबुली दिली आहे.