हटके
Related Articles
Check Also
Close
-
अन् त्याने प्रेयसी समोरच सोडला जीव ….!
4 weeks ago
मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क
तंबाखू आणि सिगारेट आरोग्यासाठी अपाय कारक आहेत त्यांनी गंभीर आजार होऊ शकतात अशी सूचना या पदार्थाच्या बॉक्स किंवा पॅकेट वर लिहलेली असते. असे असताना सुद्धा नागरिक याचे सेवन करतात. आणि मग कर्करोगा सारख्या गंभीर आजाराशी भांडतात. पण गुजरात मधून जी एक बाब समोर आली आहे त्यानंतर मात्र गरोदर महिलांनी या पासून काही शिकवण घेण्याची आवश्यकता भासत आहे. येथे प्रसव झालेल्या महिलेच्या नवजात बाळाचे शरीर निळे पडले आहे. वैद्यकीय अहवालात असे दिसून आलं आहे की, त्या लहान मुलामध्ये निकोटीनचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे त्याच्या शरीरात अशी लक्षणे दिसून येत आहेत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आईला तंबाखू खाण्याची सवय होती, त्यामुळे मुलाच्या रक्त प्रवाहात निकोटीनचे प्रमाण जास्त झाले. अहवालानुसार, बाळाच्या जन्मानंतर त्याच्या शरीरात निकोटीनची पातळी 60 एनजी/ एमएल होती जे प्रौढांमध्ये निकोटीनचे सामान्य पातळीपेक्षा 3 हजार पट जास्त आहे. त्यामुळे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे.
डॉक्टरांना बाळाच्या आईला दम्याचा त्रास असल्याचं आढळून आलं होतं. ती दिवसात 10 ते 15 वेळा तंबाखूचे सेवन करत होती. त्यामुळे तिच्या बाळामध्ये निकोटीनचे प्रमाण खूप वाढले. तसंच वैद्यकीय अहवालात सांगण्यात आलं की, बाळाची आई ही 15 वर्षांची असल्यापासून तंबाखूचे सेवन करत होती. तसंच तिच्या बाळामध्ये पाच दिवसांच्या उपचारानंतर सुधारणा दिसून आल्यानं डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला आहे.
स्त्रीरोगतज्ज्ञ तज्ज्ञांनी काय सांगितले ?
स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात की, तंबाखू आणि धूम्रपानचं सेवन केल्यामुळे आईपासून बाळाला गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे महिलांनी धूम्रपान, तंबाखू आणि दारूचे सेवन करू नये. कारण अशा महिलांमध्ये गर्भपात होण्याचा धोका अधिक असतो.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |