शेती विषयक

अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत रिलायन्स विमा कंपनीच्या प्रतिनिधीने पंचनामा अहवाला केला विश्वासघात!

Spread the love

 

अमरावती / प्रतिनिधी

सोयाबीन कापूस या पिकाचे चिंचपूर ,तुळजापूर ,बऱ्हाणपूर येथील शेतकऱ्याच्या पिक विमा सर्वे फॉर्मवर खोट्या सह्या मारलेल्या प्रकरणात तालुका कृषी ऑफिस धामणगाव रेल्वे येथे शेतकऱ्याला कोणताही न्याय न मिळाल्या मुळे दिनांक 7/5/ 2 024 ला जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारीमा .सातपुते साहेब यांना पूर्ण प्रकरण समजावून सांगितले .आणि सातपुते साहेब यांना सुद्धा प्रकरण गंभीर वाटले त्यामुळे त्यांनी शेतकऱ्याला सात तारखेला आश्वासित केले की प्रकरण गंभीर असल्यामुळे तुमची तात्काळ जिल्हाधिकारी यांच्या समवेत मिटींग लावतो, त्याच अनुषंगाने जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी मा सातपुते साहेब यांनी तात्काळ प्रकरण गंभीर असल्यामुळे आज दिनांक 17/5/2024 ला जिल्हाधिकारी मा .सौरभ कटीयार यांच्या सोबत मीटिंग लावण्यात आली होती मिटिंग मध्ये पिक विमा चे प्रमुख तीन प्रतिनिधी अभिलाष नरवडे वराजु सुर्यवंशी , शिवजीत सहाय हजर होते स्वतः जिल्हा कृषी अधीक्षक सातपुते साहेब व तक्रारकर्ते शेतकरी *पवन अ .लांबाडे ,राहुल बांबल, अभिजीत लांबाडे , पवन निकम, महेन्द्र गायकवाड सोमेश्वर ठाकरे* उपस्थित होते सर्वप्रथम जिल्हा कृषी अधीक्षक सातपुते साहेब यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर आपली बाजू मांडली की शेतकऱ्याच्या ऑफलाईन सर्वे फॉर्मवर खोट्य सहया मारल्या व ऑनलाइन सर्वे मध्ये 75 ते 80 टक्के नुकसान दाखवले असल्यामुळे ऑफलाइन सर्वे फॉर्मवर प्रतिनिधीने ते न टाकता खोटे नुकसान टाकले म्हणजेच झिरो ते पाच टक्के असे खोटे नुकसान टाकले शेतकऱ्याच्या सर्व फॉर्मवर पिक विम्याच्या प्रतिनिधीने खोट्या सह्या शेतकऱ्याच्या मागे मारल्या व त्यांचे शेतकऱ्यांचे खोटे नुकसान टाकले आहे त्यानंतर शेतकऱ्यामार्फत *जिल्हास्तरीय समितीचे पुष्पक खापरे जिल्हा स्तरीय फळपीक वीमा शेतकरी प्रतिनिधी * यानी सुध्धा शेतकऱ्यांची बाजू मांडली की रिलायन्स पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधीने आमच्या बांधावर येऊन कापूस सोयाबीन पिकाचे ऑनलाइन सर्वे केले ऑनलाईन सर्वे मध्ये आमचे 75 ते 80 टक्के नुकसान झाले झाले होते ते त्यांनी त्याच्यात ऍड केली होती आणि प्रत्यक्षात आमची त्याच्या सही सुद्धा घेतलेली होती परंतु ऑफलाइन सर्वे मध्ये त्यांनी आमच्या आमच्यासमोर फॉर्म न भरता त्यांनी स्वतः ते फॉर्म भरून खोटे नुकसान दाखवून आणि शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून आम्हाला नुकसानी भरपाई पासून वंचित ठेवले त्यामुळे आमच्या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन आमचे जेही ऑनलाईन ७५ ते ८० टक्के नुकसानीचा डाटा गेलेला आहे त्यानुसार आम्हाला मदत देण्यात यावी ही जिल्हाधिकारी यांच्या यांच्यासमोर मागणी केली. त्यानंतर रिलायन्स पिक विमा च्या प्रतिनिधींनी आपली बाजू मांडली त्यांनी आपल्या बाजूमध्ये असे म्हटले की आमच्याकडून चूक झालेली आहे आणि आमच्या सर्वेअरणी खोट्या सह्या मारल्या व खोटे नुकसान टाकले याची चूक कबुली करतो असे मान्य केले परंतु त्यांनी परत सर्वे करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देतो असे म्हटले परंतु जिल्हाधिकारी यांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली. जिल्हाधिकारी यांनी कडक शब्दात निर्देश दिले की शेतकऱ्यांनी जी मागणी केली आहे की आमचे 75 ते 80 टक्के नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्याच्या मागणीनुसार तुम्ही त्यांना आठ दिवसात मदत दया तसे न झाल्यास कंपनीवर एफ .आय .आर दाखल करण्यात येईल असे कडक शब्दात जिल्हाधिकारी साहेबा मार्फत रिलायन्स पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना निर्देश देण्यात आले आहे तसेच रिलायन्स कंपनी मार्फत ऑगस्ट महिन्यात झालेल्या मीटिंगमध्ये ते तीन प्रतीत पंचनामेच्या कॉपी देणार होते पण त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना पंचनामां च्या कॉपी पुरविल्या नाही. हे सुद्धा तेवढेच मात्र खरं आहे!

असे चुकीचे पंचनामा रिपोर्ट मुळे शेतकऱ्यांना पिक विमा नावाच्या योजनेवर विश्वास राहला नाही. आणि शेतकरी ना मिळणारे नुकसान विमा भरपाई 100 200 500 रुपये यामुळे शेतकरी युवा कंपनीची ऑफिस व कृषी विभागात चकरा मारून मेटाकुटीस आला आहे. यामुळे अमरावती जिल्ह्यात एक रुपयांमध्ये जरी पिक विमा योजना असली तरी फक्त 60 ते 70 टक्केच विमा निघत आहे ही फार मोठी शोकांतिका आहे.
पुष्पक श्रीरामजी खापरे जिल्हास्तरीय पिक विमा समिती शेतकरी प्रतिनिधी

 

शेतकरी प्रतिक्रिया
आज आमच्या धामणगाव रेल्वे तालुका मध्ये गबाळ उघड कीसआले आहे आणि काही दिवसात पूर्ण अमरावती जिल्ह्यात रिलायन्स कंपनीच्या प्रतिनिधीचे खोटे कारणामे उघडकिस येण्याचीशक्यता आहे . तरी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय तालुका कृषी अधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय इथे आपल्या तक्रारी सादर कराव्यात ही नम्र विनंती
अभिजीत नरेशराव लांबाडे, रा, चिचंपुर तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती
शेतकरी

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close