समाज भवनाच्या उत्कृष्ट बांधकामाप्रती वैभव श्रिखंडे सन्मानित
वरूड/तूषार अकर्ते
वरूड शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या संत नागाजी महाराज समाज भवनाचे वास्तु पुजन व लोकार्पण सोहळा सर्व नाभिक समाज बांधव व शहरातील प्रतिष्ठित नागरीक यांच्या उपस्थितीत दि.१५ जुलै रोज शनिवार ला पार पडला आहे.या सभागृहाचा लोकार्पन सोहळा आमदार देवेन्द्र भुयार यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधिर उर्फे बंडू राऊत यांची प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थीती होती. तसेच विशेष अतिथी म्हणून वरुड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रविण मानकर यांच्यासह शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टर मंडळी व विविध क्षेत्रातील गणमान्य मंडळी सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते. या सोहळ्या निमित्ताने शहरातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा, कृषी रत्न, वृक्ष मित्र तसेच या सभागृहाचे बांधकाम करणारे शासकीय कॉन्ट्रॅक्टर वैभव श्रीखंडे यांनी उत्कृष्ट प्रतीचे बांधकाम केल्या प्रकरणी त्यांना या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देवुन सन्मानित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे आयोजन संत नगाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व वरुड नगर परिषद यांच्या वतिने करण्यात आले होते.