सामाजिक

कपडे धूत असलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला ; मृत्यू 

Spread the love

संगमनेर (अहमदनगर) / नवप्रहार डेस्क

              घराबाहेर अंगणात कपडे धुवत असलेल्या महिलेवर बिबट्याने मागून हल्ला केला. महिलेला फरफटत शेतात नेले. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे.   घटना संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी गावात घडली आहे.   या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

संगमनेर  तालुक्यातील निमगाव टेंभी येथील वर्पे वस्ती येथे सकाळच्या सुमारास हि घटना घडली आहे. घराबाहेर कपडे धुवत असलेल्या संगीता शिवाजी वरपे (वय ४३) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यांना साधारण २० ते २५ फूट शेतात ओढत नेले. हा प्रकार त्यांचा दीर प्रवीण अण्णासाहेब वर्पे यांनी पहिला. त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर शेतात नेला. तरीही त्या बिबट्याने  सोडले नाही. परंतु काही अंतरावर बिबट्याने संगीत वर्पे यांना सोडले. मात्र यात गंभीर जखमी झालेल्या संगीता यांना खासगी रुग्णालयात नेले असता तेथे त्यांना मृत घोषित केले.

ग्रामस्थ संतप्त
हा घटनेनंतर परिसरात घाबरत पसरली असून ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. वन विभाग जे बिबटे पन्नास किलोमीटरच्या अंतरावर सोडत आहेत, हे जवळपास 250 किलोमीटरच्या अंतरावर सोडावेत. जेणेकरून ते परत येणार नाहीत. पंचक्रोशी निमगाव टेंभी, देवगाव, शिरपूर, जाकुरी या ठिकाणी कुणालाही हा बिबट्यांचा त्रास होऊ नये. परंतु जवळच्या परिसरात बिबटे सोडले जात असल्याने सर्व सामान्य शेतकऱ्याला शेती करणे सुद्धा मुश्किल झालंय. हा बिबट्या नरभक्षक झाला आहे. वनविभागाने नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close