हटके

पतीला पाठवले गरम भजी आणायला आणि स्वतः झाली रफुचक्कर 

Spread the love

बिलारी/ विशेष प्रतिनिधी

          लग्नाला जेमतेम तीन महिने झाले होते. ती पहिला सण असल्याने होळीला माहेरी गेली होती. पती तिला घ्यायला सासरी गेला होता. दोघेही परतीच्या प्रवासाला किघले असता बिलारी बस स्टँड वर पोहचले. तिने पती कडे जोराची भूक लागल्याने गरम भजी खाण्याची ईच्छा वर्तवली. तो गरम भजी आणायला गेला. भजी घेऊन आल्यावर त्याला बायको जागेवर दिसली नाही. त्याने बराच.l वेळ शोधाशोध केली परंतु बायको मिळून न आल्याने त्याने पोलिसांना कळवले.

पीतम सिंग याचं लग्न 1 डिसेंबर 2025 ला रिमझिम नावाच्या 18 वर्षांच्या मुलीसोबत झालं. होळीनिमित्त रिमझिम तिच्या माहेरी गेली होती. सण संपल्यानंतर 9 मार्चला पीतम त्याच्या पत्नीला आणण्यासाठी सासरी पोहोचला आणि दोघंही निघाले.

घरी परत येत असताना पीतम आणि रिमझिम बिलारी बस स्टँडवर उतरले आणि पुढच्या बसची वाट पाहायला लागले. तेव्हाच रिमझिमने मला भूक लागली आहे, भजी घेऊन ये, असं पीतमला सांगितलं. यानंतर पीतम समोरच्या दुकानातून गरम भजी आणायला गेला.

पीतम भजी घेऊन आला पण त्याला रिमझिम स्टँडवर दिसलीच नाही. बराच वेळ पितमने शोधलं पण त्याला रिमझिम कुठेच दिसली नाही. पितमने पत्नीबाबत आजूबाजूच्या लोकांनाही विचारलं, अखेर तो बिलारी पोलीस स्टेशनला पोहोचला आणि पत्नी हरवल्याची तक्रार दिली.

पत्नी तिच्या माहेरच्या एका युवकासोबत गेल्याचं पीतमने पोलिसांना सांगितलं आहे. पोलीस सध्या याप्रकरणाचा तपास करत असून बस स्टँडवरचे सीसीटीव्ही तपासले जात आहेत. तसंच रिमझिमचं मोबाईल लोकेशनही शोधलं जात आहे, पण नवऱ्याला भजी आणायला पाठवून पळालेल्या पत्नीची घटना आसपासच्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close