पोलिसांची नजर झुडपात गेली आणि त्यांनी असे काही पाहिले की ….
नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया
नवी दिल्लीच्या सीमेवर एका घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. इंदिरापूरम गाझियाबादमधील उत्तर प्रदेसमध्ये सकाळी पोलीस गस्तीवर आले होते. त्यावेळी 2 परदेशी तरुणी आढळून आल्या. या दोघींची वागणूक ही संशयास्पद होती, पोलिसांनी दोघींना ताब्यात घेतलं तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमी प्रमाणे दिल्लीच्या सीमेजवळील इंदिरापुरम गाझियाबाद मधील उत्तर प्रदेश पोलीस सकाळी गस्तीवर होते. याच दरम्यान पोलिसांची नजर महामार्गाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर पडली. त्या ठिकाणी दोन तरुणी संशयास्पद अवस्थेत आढळून आल्या होत्या. इतक्या मोकळ्या जागेत सकाळच्या वेळी या मुली इथं काय करत आहे, असा प्रश्न पोलिसांना पडला.
पोलिसांनी या दोन्ही तरुणींना जवळ बोलावलं. जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घातलेल्या या दोन्ही मुली परदेशी नागरिक असल्याचं लक्षात आलं. जेव्हा या तरुणी जवळ आल्या तेव्हा आणखी घाबरलेल्या होत्या. परदेशातून आल्यामुळे त्या आपल्या देशातील भाषेत बोलत होत्या. त्यामुळे पोलिसांना नेमकं काय बोलतात हे कळत नव्हतं. पोलिसांनी दोघींना समज दिला, पण तरीही ड्रामा काही केला कमी होत नव्हता.. शेवटी पोलिसांनी दोन्ही तरुणींना ताब्यात घेतलं आणि संबंधित दूतावासामध्ये संपर्क साधला.
एसीपी स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले की, इंदिरापुरम परिसर दिल्लीशी जोडलेला आहे. पोलीस कर्मचारी पहाटे गस्तीवर होते. या भागात चोरीच्या मोठ्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पोलिसांची गस्त वाढवण्यात आली होती. याच दरम्यान या दोन तरुणी आढळून आल्या होत्या. पोलिसांनी या दोन्ही तरुणींना ताब्यात घेतलं आहे. त्यांना इंदिरापुरम पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. त्यानंतर एकीनं तिचं नाव करोरी आणि दुसरीने ॲलिस मॅसी असं सांगितलंय. दोघीही केनियातील नैरोबी येथील रहिवासी आहेत. या दोघी सध्या दिल्लीतील संगम विहार इथं राहतात. पोलिसांनी त्यांच्याकडे व्हिसा आणि पासपोर्टची मागणी केली. पण त्यांना काही दाखवला नाही. पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवल्या, तेव्हा मोबाईलवर दाखवलेला व्हिसा मार्च 2023 मध्ये संपलेला होता. त्यानंतर पोलिसांनी केनिया दूतावासाशी संपर्क साधला असून कायदेशीर कारवाई सुरू आहे.