क्राइम

पोलीस निरीक्षकांचा आला फोन आणि शिक्षिकेला आला हृदय विकाराचा धक्का 

Spread the love

आग्रा (युपी)/ नवप्रहार डेस्क 

                      एका शिक्षिकेला तिच्या मोबाईलवर एक कॉल येतो. पलीकडील व्यक्ती शिक्षिकेला म्हणतो की तुमची मुलगी सेक्स रॅकेट मध्ये पकडल्या गेली आहे.तिला सोडवायचे असल्यास १ लाख घेऊन या. मागून मुलीचा  आई मला सोडवं असा आवाज आल्याने घाबरलेल्या शिक्षिकेला हृदय विकाराचा धक्का आला आणि त्यात तिचा मृत्यू झाला.

या महिलेला व्हॉटसअॅपवर आलेल्या कॉलमध्ये तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये पकडली गेली आहे. तुम्हाला तिची सुटका करायची असेल तर १५ मिनिटांत १ लाख रुपये पाठवा, अन्यथा तिचे व्हिडिओ व्हायल होतील असा दम पोलिस निरीक्षकांनी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कॉलमुळे या महिलेला धक्का बसला आणि तिला हृदविकाराचा झटका आला.

या कॉलमध्ये आरोपीने आई, मला वाचव असा आवाजही एेकवला. मालती वर्मा (५८) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्या अछनेरा येथे मुलींच्या कनिष्ठ माध्यमिक विदयालय येथे शिक्षिका होत्या. ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता हा कॉल आला होता. त्यानंतर त्यांनी ही घटना आपल्या मुलालाही सांगितली. ज्या फोनवरुन कॉल आला होता. त्याचा फोन कोड +९२ आहे. तो पाकिस्तानचा आहे. याप्रकरणाची तक्रार गुरुवारी पोलिसांमध्ये देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close