क्राइम

आरोपींना बेड्या ठोकणारा पोलिस निरीक्षक बनला खुनाच्या गुन्ह्याचा आरोपी

Spread the love

महोबा (युपी)/ विशेष प्रतिनिधी

                 तिचे आणि तिच्या CRPF मध्ये नोकरीवर असलेल्या पतीचे लग्नानंतर पटत नव्हते. त्यांच्यात अनेक वेळा भांडणे होत होती. त्यामुळे तिने पती आणि सासरच्या मंडळीच्या विरोधात महोबा ठाण्यात तक्रार दाखल केली.  या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अंकित जाधव कडे सोपवण्यात आला होता. आणि तेव्हा पासून अंकित आणिं किरण यांच्यात नियमित बोलणे सुरू झाले.

                हळूहळू या बोलण्याचे रूपांतर प्रेमात झाले. मागील दोन वर्षांपासून अंकित आणि किरण यांच्यात प्रेम निर्माण झाले. त्यांच्यात अनेक वेळा शारीरिक संबंध बनले. यानंतर किरण अंकित वर लग्नासाठी दबाब.टाकू लागली. अंकित तिला टाळाटाळ करू लागला.  त्यामुळे त्यांच्यात भांडण होऊ लागले. किरण चा दबाब वाढत असल्याचे पाहून अंकित ने तिला संपविण्याचा निर्णय घेतला.

12 नोव्हेंबर रोजी अंकितने त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून कार घेतली. त्याने किरणला गाडीतून फिरवण्यासाठी बोलवलं. किरण सुद्धा आनंदाने त्याच्यासोबत गेली. दरम्यान, अंकितने गाडीत किरणसोबत बऱ्याचदा लैंगिक संबंध प्रस्थापित केले. खरं तर, अंकितने गाडीत शक्तीवर्धक गोळ्या घेऊन किरणसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर, दोघांमध्ये काही कारणावरून मोठं भांडण झालं आणि वाद वाढल्यावर अंकितने किरणला शेतात नेऊन लोखंडी रॉडने तिची हत्या केली.

हत्येनंतर पीडितेला नग्न अवस्थेत शेतात सोडलं अन्…

हत्येनंतर आरोपीने अंकितला नग्न अवस्थेत शेतात टाकून पळ काढला. महिलेची ओळख पटल्यानंतर, पोलिसांनी पुराव्यांचा वापर करून आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार, हत्येत वापरलेला लोखंडी रॉड आणि दोघांमधील मोबाईल चॅट्स तसेच कॉल रेकॉर्डिंग जप्त केले. या ठोस पुराव्याच्या आधारे, आरोपी अंकित यादवला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close