सामाजिक

तलावात उडी घेणारा व्यक्ती आपला प्रियकर असल्याच्या शंकेने तरुणीने सुद्धा घेतली उडी

Spread the love

कल्याण / नवप्रहार मीडिया 

                एका व्यक्तीने तलावात उडी मारली हे तरुणीला समजल्यावर तो व्यक्ती आपला प्रियकर आहे हे समजून तिने देखील तलावात उडी टाकली. पण सुदैवाने परिसरातील एका युवकाने तिचा जीव वाचवला. नंतर समजले की गळवात उडी घेणारा तिचा प्रियकर नसून दुसराच कोणी होता.

तरुणीने उडी घेण्याआधी काही वेळापूर्वी याच तलावात पोहण्यासाठी गेलेल्या महेश भाटिया या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. मात्र तरुणीचा आपल्याच प्रियकराने उडी मारल्याचा गैरसमज झाला होता. या विचित्र घटनेमुळे कल्याण नांदिवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कल्याण पूर्वेतील नांदिवली तलावात काल सायंकाळच्या सुमारास महेश भाटिया हा तरुण पोहण्यासठी गेला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

कल्याण अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. दुसरीकडे व्यक्तीने उडी मारल्याची माहिती ऐकताच एका तरुणीने तलावात उडी मारली होती. या तरुणीला या तलाव परिसरात राहणाऱ्या शुभम शेट्ये नावाच्या तरुणाने धाडस दाखवित वाचवले. त्या तरुणीला तलावातून बाहेर काढले.

तरुणाने वाचवला तरुणीचा जीव

तरुणीने बाहेर येताच सांगितले की, तिच्या प्रियकराने तलावात उडी मारली म्हणून मी उडी मारली होती. परंतु तरुणीच्या आधी उडी मारणारा तिचा प्रियकर नव्हता. त्या व्यक्तीचे नाव महेश भाटिया आहे.

तो तलावात पोहण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तिचा प्रियकर समोर आला, त्यामुळे गैरसमजातून तरुणीने तलावात उडी घेतली होती. सुदैवाने तिचा जीव बचावला. मात्र या घटनाक्रमामुळे पोलीस देखील चक्रावले .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close