गुन्हेशाखा युनिट क्र. २ यांची कामगिरी :- जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस, ६,४०,००० /- रू चा मुद्देमाल जप्त
नागपूर / प्रतिनिधी
दिनांक २२/०४/२०२३ चे १५:२० वा चे सुमारास फिर्यादी योगेश हरीषचंद्र चौधरी वय ४६ वर्ष रा. हाउस नं. ६३५, रामनगर, मरारटोळी, अंबाझरी हे व त्यांचे सोबत गाडी चालक अमीत नागोसे असे त्यांचे स्वीफ्ट गाडी क्र. डी. एल. १३ सी.ए. ९८९२ ने ईतवारी येथुन फिर्यादीचे कार्यलयात जात होते. पो. ठाणे अंबाझरी हद्दीत लेडीज क्लब चौक नंतर, सिव्हील लाईन, १६० गाळे, जिल्हा परिषद कार्यकारी बगल्याचे बाजुला अॅक्टीव्हा गाडी वरून आलेले दोन अज्ञात आरोपी यांनी फिर्यादीचे कारला मागुन धडक दिली व अॅक्टीव्हा गाडी फिर्यादीचे गाडीचे समोर लावली. आरोपींनी फिर्यादीस अग्नीशस्त्राचा धाक दाखवुन, चालकाचे बाजुची काच दगडाने फोडली. दरम्यान फिर्यादी हे त्यांचे जवळील पैश्याचे बॅगसह पळुन जात असता त्यांचा पाय घसरल्याने ते खाली पडले असता, आरोपींनी फिर्यादीचे डोळयात मिर्ची पावडर टाकुन, फिर्यादी जवळील ८,४७,४५०/- रू असलेली बॅग हिसकावुन घेवुन पळुन गेले. अश्या फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे अंबाझरी येथे आरोपींविरूध्द कलम ३९४, ३४ भादवी सह कलम का अन्वये गुन्हा दाखल होता.. ३ / २५ भा. ह.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क्र. २ चे अधिकारी व कर्मचारी यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून व तांत्रीक तपास करून गुन्हातील आरोपी १) अभिषेक सुभाष बनसोड वय २० वर्षे रा. हरीओम सोसा. खडगाव रोड, प्लॉट नं. २२०, पो.ठाणे वाडी नागपूर २) अमित भाउराव खांडेकर वय ४३ वर्षे रा फुटाळा तलाव कार्पोरेशन शाळे जवळ पोटाणे अंबाझरी पो. ठाणे अंबाझरी ३) अमित अजय नागोसे वय २५ वर्षे रा. रविनगर सी. पी. एन्ड बेरार कॉलेज चे क्वॉर्टर मध्ये पो. ठाणे अंबाझरी नाग्रपूर यांना निष्पन्न करून ताब्यात घेतले. आरोपींची सखोल विचारपूस केली असता आरोपींने वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेले दोन अॅक्टीव्हा वाहने, तिन मोबाईल फोन, व रोख ५,५७,००० /- य असा एकुण ६,४०,०००/- य चा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना वरील गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
वरील कामगिरी मा.पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) श्री मुम्मका सुदर्शन, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. मनोज सिडाम, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री, राहुल शिरे, सपोनि. गणेश पवार, गजानन चांभारे, तुषार काळेल, पोउपनि. बलराम झाडोकार, पोहवा. संतोष मदनकर, संतोषसिंग ठाकुर, रामनरेश यादव, रोनॉल्ड अॅन्थोनी, राजेश तिवारी, आशिष ठाकरे, महेन्द्र सडमाके, किशोर ठाकरे, शैलेश जांभुळकर, गजानन कुबडे, प्रविण रोडे, चंद्रशेखर राघोर्ते, अनंता क्षिरसागर, नितेश ईंगळे, कमलेश गहलोद, शेषराव राऊत, सुनिल कुँवर, मंगल जाधव, विवेक श्रीपाद, प्रविण चव्हाण, पराग ढोक, मिथुन नाईक, निलेश श्रीपात्रे यांनी केली.