राजकिय

राज्यात पुन्हा राजकीय हालचालींना वेग 

Spread the love

अजित दादांची अनुपस्थिती मुळे चर्चांना उधाण

मुंबई / नवप्रहार मीडिया 

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे गैरहजर असल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे. तर बैठक संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहे. वरिष्ठांच्या भेटीसाठी दोघेही नेते दिल्लीला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर दाखल झाले आहे. वरिष्ठांच्या भेटीसाठी दोघेही दिल्लीला रवाना होणार आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या बैठकीत मंत्रीमंडळाच्या विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. सध्याच्या परिस्थित नव्याने मंत्री झालेल्या मंत्र्यांकडे अद्याप कुठल्याही राज्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवलेली नाही.

चौथ्या मंत्रिमंडळाचा विस्तार करून पक्षातील अंतर्गत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. भाजप-शिवसेना (शिंदेगट) गटाच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर दोन दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे. यामुळे अनेक मंत्र्यांना ही जबाबदारी सांभाळताना तारेवरची करसरत करावी लागत असून या सर्व गोष्टींचीही चर्चा बैठकीत झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close