लाखांदूर तालुक्यातील झरी उपसा सिंचन व दहेगाव कायनाईड खान मार्गी लागेल काय?
अनेक आंदोलन व निवेदनाची दखल केव्हा?
हिवाळी अधिवेशनात मंजूर होणार का? अन्यथा आंदोलन.
भंडारा/ लाखांदूर : लाखांदूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना सिंचन होईल या आशेने गेल्या अनेक वर्षापासून तलावाची दुरुस्ती व उपसा करन्यासाठी आंदोलन, मोर्चे व निवेदनातून झरी तलावाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले पण अजुन प्रयत्न प्रश्न मार्गी न लागल्याने शेतकऱ्यानं मध्ये असंतोष निर्माण झाला आहे.तसेच चार हजार बेरोजगारांना रोजगार देणारा कायनाईड खान दहेगाव भारताच्या नकाशावर सुद्धा त्याची माहिती असताना मात्र रॉयल्टी मुळे गेल्या 20 वर्षापासून बंद पडले आहे.सुरू करण्यासंदर्भात अनेक आंदोलन केले असता महाराष्ट्र कार्पोरेशन कंपनी ने भव्य मोठी इमारत तयार करून ठीया करून बसण्यात आले.मात्र अजून पर्यंत शासनाने संमती मंजुरी न दिल्याने अनेक बेरोजगारांना न्याय पासून वंचित ठेवण्याचे काम होत आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र यावर बोलताना दिसत नसल्याने शेतकरी व बेरोजगार मोठ्या संख्येत जन आंदोलन मोर्चे बांधणी करायला लागले आहे. अशा आक्रमक मोठ्या भूमिके मुळे स्थानिक नेत्यांची भूमिका जनते समोर येऊन मोठी गोची होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
*व्यवस्थित पाठपुरावा करून सुद्धा न्याय मिळाला नाही:- बालू चुन्ने तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस*
*मंत्रालयात मुंबई येथे अनेकदा स्वतः भेटून पाठपुरावा केला तसेच आंदोलन व निवेदन दिले.त्याचा फायदा झाला असून फक्त शासनाने बेरोजगार व शेतकऱ्यांचा अंत न पाहता कायनाईड खान व झरी उपसा सिंचन ला मंजुरी प्रदान करावी.*