हटके

त्या दोघांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल होताच त्यांनी केले असे 

Spread the love

दवनगिरी ( कर्नाटक )/ नवप्रहार मीडिया नेटवर्क 

महाविद्यालयीन तरुण तरुणीचा टेरेस वरील खाजगी क्षणाचा व्हिडीओ लीक झाल्याने बदनामीच्या भीतीपोटी तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. याबाबत त्या तरुणाला समजल्यावर त्याने देखील आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार काही महिन्यांपूर्वी, जेव्हा प्रथम वर्षाचे दोन विद्यार्थी (एक तरुण व एक तरुणी) त्यांच्या सरकारी महाविद्यालयाच्या टेरेसवर एकत्र होते, तेव्हा अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नकळत त्यांचा आक्षेपार्ह्य व्हिडिओ शूट केला.एकूण ३. २१ मिनिटांची संपूर्ण व्हिडिओ क्लिप शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली.या दोघांच्याही कुटुंबीयांनी स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत आणि या प्रकरणात व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीला शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे, असे पोलिस अधीक्षक (एसपी) के अरुण यांनी सांगितले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close