हटके

भावाने बहिणीसाठी केला असा जुगाड की नेटकरी म्हणाले भाऊ असावा तर असा

Spread the love

        सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात काही भावनिक ,काही खोडकर ,काही बोधात्मक तर काही भयानक असतात. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओ ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे काय आहे या व्हिडिओत ? तर मग पाहूया….….

          एका विशिष्ट वयात भाऊ आणि बहिणीचा खोडकर पणा हा काही तुमच्या आमच्यासाठी नवीन विषय नाही. कारण आपल्यापैकी अनेक लोकांनी हा जिव्हाळा अनुभवलेला आहे. आम्ही आपणाला ज्या व्हिडीओ बद्दल सांगणार आहोत ते वाचून तुम्हीही म्हणाल की भाऊ असावा तर असा.

बहिण-भावाच्या अशाच एका प्रेमळ जोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक भाऊ आपल्या लहान बहिणीला सायकल सवारी करून सांभाळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

‘जिंदगी गुलजार है’ या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ९ ते १० वर्षांचा एक मुलगा सायकलवर लहान मुलीला मागच्या सीटवर बसवून प्रवास करत आहे. ती मुलगी त्या मुलाची बहिण आहे. असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. बहिण सायकलवर बसून भावाला घट्ट पकडून प्रवास करत असल्याचं व्हिडीओत दिसतंय. पण आपल्या लाडक्या बहिणीचे पाय चाकात अडकू नये, म्हणून भावाने भन्नाट जुगाड करून तिचे पाय रस्सीने सीटच्या दांडीला बांधले. अशाप्रकारे मोठ्या भावाने छोट्या बहिणीला सुरक्षित ठेवलं.

या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप लाईक केलं जात आहे. व्हिडीओला ५२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, असा भाऊ सगळ्यांना मिळावा. तर दुसऱ्या यूजरने म्हटलं, बहिण-भावाची जोडी किती सुंदर आहे. तर तिसऱ्याने म्हटलं, बहिणीचे पाय चाकात अडकू नये म्हणून रस्सीने बांधले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close