क्राइम

आनंदांवन येथील हत्याकांडाचे रहस्य अवध्या काही तासातच उलगडले

Spread the love
प्रियकरानेच केली आरती ची हत्या 

चंद्रपूर  / नवप्रहार डेस्क 

              आनंदवन येथे गुरुवारी (दि. 25 जून ) रोजी झालेल्या हत्येचा छडा पोलिसांनी काहीं तासातच लावला आहे. आरती ची हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचे समोर आले असुन प्रियकरानेच तिची हत्या केली आहे. या दोघांच्या मधात तिसऱ्याची एन्ट्री झाल्याने नाराज झालेल्या प्रियकराने ही हत्या केल्याचे उघड झाले आहे.

              वरोरा येथील प्रसिद्ध अश्या आनंदवन आश्रमात गुरुवारी येथे राहणाऱ्या आरती चंद्रवंशी या 29 वर्षीय तरुणीची हत्या करण्यातआली होती. तिचे आई वडील घरी आल्यानंतर ही बाब उघड झाली होती. याबद्दल आरतिच्या वडिलांनी पोलिसांना  कळविले होते. पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपींला अटक केली आहे.

प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवन आश्रमातील एका खोलीत 25 वर्षीय आरती चंद्रवंशी या तरूणीची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. आरतीचे आई-वडील घराबाहेर असताना आरोपीने संधी साधत तिची हत्या केली होती. या घटनेनंतर आई-वडील ज्यावेळेस घरी आले आणि त्यावेळेस बाथरूममध्ये मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. त्यानंतर मृत मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर 24 तासाच्या आता आरोपीला गजाआड करण्यात आले होते.

मृत तरूणीचे वडील दिगंबर चंद्रवंशी हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्नी व मुलीसह आनंदवनात राहत होते. बुधवारी दिगंबर आणि त्यांची पत्नी दोघेही पहाटे सेवाग्रामला निघाले, त्यामुळे मुलगी आरती घरी एकटीच होती. या दरम्यान दिगंबरने दुपारी आरतीला अनेकदा फोन केला, मात्र तिचा फोन बंद होता. त्यानंतर रात्री आठ वाजता दोघेही अपंग पती-पत्नी घरी आले असता बाथरूममध्ये आरती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून त्यांना धक्काच बसला होता.

या घटनेनंतर मृत तरूणीच्या आई-वडिलांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला असता आरतीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. मात्र घटनास्थळी कोणत्याही प्रकारचे हत्यार सापडले नव्हते. त्यामुळे आरोपीचा छडा लावणे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. पण तरीही ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्नोलॉजीच्या मदतीने पोलिसांनी आरोपी समाधान माळीला अटक केली आहे.

प्रेम प्रकरणातून तरूणीचा खून

आरोपी समाधान माळी हा कुष्ठरुग्ण असून वर्षभरापूर्वी तो आनंदवनात उपचारासाठी आला होता. आणि रुग्णालयातच काम देखील करायचा. या दरम्यान मृत तरूणीच्या वडिलांशी समाधानची मैत्री झाली होती आणि भेटीगाठी वाढल्या होत्या. यामुळे आरोपी समाधानची आरतीशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि एकमेकांना लग्नाचे वचने देऊ लागले होते.

याच दरम्यान या दोघांमध्ये एका तिसऱ्याची एन्ट्री होते. आरतीची एका गोंदिया जिल्ह्यातील तरुणाशी ओळख होते. या ओळखीनंतर आरती समाधानपासून दुर राहण्यास सुरूवात करते. ही बाब समाधानला समजताच दोघांमध्ये भांडणाला सुरूवात होते. या भांडणातूनच समाधान आरतीच्या हत्येचा कट रचतो. समाधानने तीन महिन्यांपूर्वी ऑनलाइन साइटवरून चाकू मागवला होता. या चाकूच्या मदतीने त्याने आरतीचा हत्या केली होती. आरतीचे आई-वडील सेवाग्राम येथे गेले होते, आरती घरी एकटीच होती, याचा फायदा घेऊन घरात घसून समाधानने तिचा गळा चिरला होता.

दरम्यान आरतीच्या मैत्रिणीने या दोघांमधील प्रेमसंबंधाची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार मैत्रिणीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक करून चौकशी केली असता मृत्यूचं गूढ उकललं. सध्या पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या हत्याकांडानंतर आरोपीने कौशल्य विकास परीक्षेचा पेपरही दिला आणि नागपूरजवळील अशोकवनला आपल्या मित्राला भेटायलाही गेला होता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close