क्राइम

सुटकेस मध्ये सापडलेल्या त्या मृतदेहाचे गूढ उकलन्यात पोलिसांना यश

Spread the love

कुर्ला (मुंबई)/ नवप्रहार मीडिया

                बंद सुटकेस मध्ये आढळलेल्या त्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. त्या महिलेची हत्या तिच्या लिव्ह एन पार्टनर ने केली असल्याचे उघड झाल्याने त्यांनी त्याला अटक केली आहे.

मुंबईतल्या कुर्ला भागात एका बंद सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली होती. हत्या झालेल्या महिलेची ओळख पटवणे तसेच आरोपीला शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते

चारित्र्याच्या संशयावरून महिलेची हत्या झाली, अशी प्राथामिक माहिती आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष ५ ने मृत महिलेच्या प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला आणि संशयित आरोपी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

महिलेच्या चारित्र्यावर तिच्या प्रियकराला संशय होता. यावरून दोघांमध्ये अचानक वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने मृत महिलेची हत्या केली. त्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून कुर्ला येथे मेट्रोचं काम सुरू असलेल्या साईटवर फेकून दिला.

महिलेची ओळख पटवू नये म्हणून आरोपीने तिचा चेहराही विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही, तर त्याने महिलेसोबत राहत असलेले सर्व पुरावे देखील नष्ट केले. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close