विशेष

रहस्यमयी दगड : अनेक प्रयत्नानंतर तसूभरही हलला नाही

Spread the love

शास्त्रज्ञ सुध्दा शोधू शकले नाही कारण , पाहिल्यावर असे वाटते की कधी ही पडू शकतो

                    आपल्या देशात अशी काही रहस्यमयी ठिकाणे आहेत की ज्या बद्दल नेहमी जनतेच्या मनात उत्सुकता असते. जनताच काय शास्त्रज्ञ देखील या मागील कारण शोधण्यात अपयशी ठरले आहेत. या रहस्यमयी ठिकाणात महाबलीपुरम स्थित त्या महाकाय दगडाचाही समावेश आहे. ज्याला ‘ बटर बॉल ‘ असे देखील संबोधल्या जाते. चला तर जाणून घेऊया या चमत्कारिक दगडाबद्दल……..

हा दगड चेन्नई येथे स्थित आहे.हा महाकाय दगड काढण्यासाठी एका शक्तिशाली राजाला चक्क घाम गाळावा लागला होता. तर 1908 मध्ये मद्रासचे गव्हर्नर आर्थर यांनी हा दगड काढण्यासाठी चक्क 7 हत्ती लावले. पण तो दगड जराही हलला नाही. काय रहस्य आहे या दगडामागे? जाणून घेऊया या गूढ दगडाबद्दल…

1300 वर्षात अनेक प्रयत्न झाले अपयशी…

दक्षिण भारतातील चेन्नईमधील एका गावात महाबलीपुरमच्या (Mahabalipuram) काठावर हा रहस्यमय दगड असून ‘ भगवान कृष्णाचा बटर बॉल’ (Shri Krishna Butter Ball) नावाने तो प्रसिद्ध आहे. लोकांची यामागे अशी धारणा आहे की, हा दगड कृष्णाचा आवडचा पदार्थ लोण्याच्या गोळ्याचा प्रतीक आहे, जो चक्क स्वर्गातून पडला आहे. कृष्णा बटर बॉल नावाचा हा दगड एका टेकडीच्या शिखरावर आहे. या ‘कृष्णा बटर बॉल’ची उंची 20 फूट असून तो 5 मीटर रुंद आहे. खडकाचा पाया टेकडीच्या अगदी उतारावर असला तरीही 4 फुटांपेक्षा कमी आहे. दगडाचे वजन सुमारे 250 टन आहे. हा दगड चार फुटांपेक्षा कमी उंचीच्या टेकडीच्या उतारावर आहे. या दगडाला पाहून असे वाटते की, तो कधीही पडू शकतो. हा दगड काढण्यासाठी गेल्या 1300 वर्षात अनेक प्रयत्न झाले पण सर्व अपयशी ठरले. हा दगड सुमारे 45 अंशांच्या उतारावर आहे.

स्वर्गातून आला ‘कृष्णाचा बटर बॉल’?

असे म्हणतात की, हा दगड थेट स्वर्गातून पडून या ठिकाणी आला आहे. असे म्हटले जाते की हा एक लोणीचा गोळा आहे, जो भगवान श्रीकृष्ण जेवत असताना स्वर्गातून पडला होता. या कारणास्तव या दगडाला ‘देवाचा दगड’ असेही म्हणतात. हा महाकाय दगड पाहण्यासाठी अगदी दुरून पर्यटक महाबलीपुरमला येतात. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान कृष्णाने अनेकदा मटक्यातून लोणी चोरले आणि हा दगड म्हणजे भगवान कृष्णाने चोरलेला लोणीचा गोळा आहे. महाबलीपुरम हे एक ऐतिहासिक शहर आहे, ज्याला मल्लापुरम देखील म्हटले जाते. बंगालच्या उपसागराच्या काठावर वसलेले हे शहर 7व्या आणि 8व्या शतकात बांधलेल्या भव्य मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे.

नैसर्गिक आपत्तीही दगडाला हलवू शकली नाही

पल्लव राजा नरसिंह वर्मन, ज्याने 630 ते 668 इसवी सन दरम्यान दक्षिण भारतावर राज्य केले, या राजाने हा दगड तिथून हलवण्याचा प्रयत्न केला. त्याचा असा विश्वास होता की, हा दगड स्वर्गातून पडला असल्याने शिल्पकार त्याला स्पर्श करू शकत नाहीत. त्यामुळे राजाने स्वत: हा दगड हलविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र पल्लव राजाचा हा प्रयत्न फसला. 250 टन वजनाचा ‘कृष्णा बटर बॉल’ हा दगड गेल्या 1300 वर्षांपासून भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ अशा अनेक नैसर्गिक आपत्तींनंतरही स्थिर आहे. एवढेच नाही तर हा दगड काढण्यासाठी मानवाने अनेक प्रयत्न केले, पण सर्व अपयशी ठरले. जगभरातून महाबलीपुरममध्ये येणारे लोक नैसर्गिक दगडापासून बनवलेला ‘कृष्णा बटर बॉल’ पाहून थक्क होतात.

7 हत्ती मिळूनही दगड हलवू शकले नाहीत

1908 मध्ये ब्रिटीश राजवटीत मद्रासचे गव्हर्नर आर्थर लॉली यांनी हा दगड हटवण्याचा प्रयत्न सुरू केला. हा मोठा दगड लोटून गावापर्यंत पोहोचला तर अनेकांना जीव गमवावा लागू शकतो, अशी भीती लॉली यांना होती. यावर उपाय म्हणून गव्हर्नर लॉली यांनी सात हत्तींच्या साहाय्याने दगड हटविण्याचा प्रयत्न सुरू केला, मात्र अथक परिश्रमानंतरही हा दगड हटला नाही. शेवटी लॉली यांना पराभव स्वीकारावा लागला. आता हा दगड स्थानिक लोक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.

गुरुत्वाकर्षणाच्या नियमांच्या विरुद्ध असेलला दगड

  • हा दगड 20 फूट उंच आणि 5 मीटर रुंद आकाराचा आहे. ज्याचे वजन सुमारे 250 टन आहे.
  • बटर बॉलचा मोठा आकार असूनही भौतिकशास्त्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमांच्या विरुद्ध आहे.
  • हा जड दगड अनेक शतकांपासून टेकडीच्या 4 फूट पृष्ठभागावर एका ठिकाणी विसावला आहे.
  • कोणत्याही क्षणी हा दगड पडून या टेकडीचा चक्काचूर होईल, असे पर्यटकांना वाटते.
  • या दगडाचे अस्तित्व आजपर्यंत एक गूढच आहे. यावर शास्त्रज्ञ अनेक सिद्धांत मांडतात. पण ठोस उत्तर मिळाले नाही.

जेव्हा पंतप्रधान मोदींनी जिनपिंगसह या दगडासमोर फोटो काढले

2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग(XI Jinping) यांची तामिळनाडूच्या किनारपट्टीवर वसलेल्या महाबलीपुरम ऐतिहासिक स्थळावर भेट झाली. यावेळी नरेंद्र मोदींनी जिनपिंग यांना महाबलीपुरममध्ये कृष्णा बटर बॉलसमोर उभे राहून फोटो काढले. या दोन्ही नेत्यांचे एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर लोकांच्या कुतूहलाचा विषय बनला होता. या चित्रात पीएम मोदी आणि शी जिनपिंग यांच्या मागे एक मोठा दगड दिसत होता, जो अत्यंत धोकादायक पद्धतीने पुढे झुकत होता. हा एक महाकाय ग्रॅनाइट दगड आहे जो कश्ना बटर बॉल या नावाने खूप प्रसिद्ध आहे. मथुरेत जन्मलेल्या भगवान श्रीकृष्णाचा बटरबॉल इथपर्यंत कसा पोहोचला आणि महाबलीपुरमचा कृष्णाशी काय संबंध आहे याची उत्सुकता तेव्हा सर्वांनाच लागली होती

या दगडापुढे गुरुत्वाकर्षणही कुचकामी ठरले…

गुरुत्वाकर्षणाचाही या दगडावर काहीही परिणाम होत नाही. दुसरीकडे, स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की एकतर देवाने हा दगड महाबलीपुरममध्ये ठेवला होता, ज्यांना तो किती शक्तिशाली आहे हे सिद्ध करायचे होते किंवा हा दगड स्वर्गातून आणला होता. हा दगड त्याच्या नैसर्गिक स्वरूपात असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. पृथ्वीवरील नैसर्गिक बदलांमुळे असे असामान्य आकाराचे दगड निर्माण झाले आहेत, असे भूगर्भशास्त्रज्ञांचे मत आहे. सध्या विज्ञानात एवढी प्रगती होऊनही हा 250 टन वजनाचा दगड 4 फूट पायावर कसा उभा आहे? हे अद्याप कळू शकलेले नाही.

शास्त्रज्ञ काय म्हणतात?

‘या दगडामागे काहीतरी गूढ दडलेले आहे’, असे भूगर्भशास्त्रज्ञांचे मत आहे. कारण कोणताही दगड नैसर्गिकरीत्या एका जागी इतक्या वर्षांपर्यंत कोणत्याही प्रकारची हानी न करता टिकून राहू शकत नाही, परंतु ते त्याला देवाचा चमत्कारही मानत नाहीत, त्यामुळे या दगडावर सातत्याने संशोधन सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close