वडील आणि प्रियकराने मिळून केली तरुणीची हत्या

टिकली चे गावातील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. त्यातून ती गर्भवती झाली. तीला प्रियकरासोबत लग्न करायचे होते तर प्रियकराला तसे करायचे नव्हते. या मुळे वडिलांची समाजात बदनामी होणार होती. त्यामुळे त्या दोघांनी मिळून टिकलिची हत्या केली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, टिकली चौहान असे मृत्यु झालेल्या मुलीचे नाव आहे. तर रामरतन चौहान असे आरोपी वडिलांचे आणि वी.के सिंह यादव प्रियकराचे नाव आहे. गेल्या 28 जुलै रोजी टिकली घराच्या बाहेर काही कामानिमित्त पडली होती. मात्र थोड्या वेळानंतर तिचा मृतदेह घराच्या मागे आठवण आल्यामुळे गावात खळबळ माजली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी टिकलीचा खून झाला असल्याची माहिती दिली. तसेच या घटनेचा तपास करीत असताना पोलिसांनी टिकली चौहानच्या कुटुंबियांची चौकशी केली. तेव्हा सर्व सत्य उघडकीस आले. तसेच, मुलीच्या वडिलांची चौकशी केल्यानंतर त्यांनी आपण केलेल्या गुन्ह्याचे कबुली दिली. तसेच यामध्ये तिचा प्रियकर देखील सामील असल्याची माहिती पोलिसांना आरोपी वडिलांनी दिले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मग टिकलीच्या प्रियकराला देखील ताब्यात घेतले.
यावेळी, टिकली नुकतीच गर्भवती राहिली होती. यामुळे तिचे वडील तिच्यावर प्रचंड नाराज होते. तसेच दुसऱ्या बाजूला टिकलीने प्रियकरासोबत लग्न करण्याचा अट्टाहास ठरला होता. मात्र आरोपी प्रियकराला तिच्यासोबत लग्न करायचे नव्हते. 28 जुलै रोजी टिकली घराच्या बाहेर पडल्यानंतर तिच्या मागे तिचे वडील देखील गेले. यानंतर त्यांनी ओढणीने गळा आवळत टिकलीची हत्या केली. यानंतर आरोपी प्रियकराने तिचा मृतदेह एका खड्ड्यात फेकून दिला. दरम्यान याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात कलम ३०२, आयपीसी ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच एका वडिलांनी आपल्या मुलीची हत्या केल्यामुळे या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वी देखील समाजात बदनामी होऊ नये यासाठी कुटुंबानेच मुलींची हत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. आता तर वडिलांनी मुलीच्या प्रियकरासोबतच मिळून तिचा काटा काढल्याचे उघडकीस आले आहे.