Uncategorized

एकतर्फी प्रेमातून त्या महिलेची हत्या झाल्याचे उघड  

Spread the love
खडकी / नवप्रहार न्यूज नेटवर्क
            भर रस्त्यात महिलेची चाकू भोसकून हत्या केल्याच्या  प्रकरणात पोलिसांच्या हाती सुगावा लागला असून पोलिसांनी आरोपीला कर्नाटक च्या विजापूर येथून अटक केली आहे. महिलेवर युवकाचे एकतर्फी प्रेम असल्याने आणि महिले कडून मिळालेल्या नकारा मुळे आरोपीने महिलेची हत्या केल्याचे उघड झाले आहे. आरोपी हा रिक्षाचालक आहे.
नसीर बिराजदार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रजनी राजेश बैकेल्लू (वय ४४, रा. कुंदनकुशल सोसायटी, बोपोडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत रजनी यांचे बंधू ईश्वर गोविंद स्वामी (वय ५२, रा. गुरव चाळ, बोपोडी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे
कामाला जात असताना महिलेचा भर रस्त्यात चाकूने भोसकून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली होती. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी महिलेवर वार केले. प्राथमिक तपासात महिलेवर एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. रजनी यांच्या पतीचे १० वर्षांपूर्वी निधन झाले. पतीच्या जागेवर रजनी अनुकंपा तत्त्वावर खडकीतील स्टेशन हेडक्वॉर्टर येथे नोकरीस होत्या. दोन वर्षांपूर्वी अपघात झाल्याने त्यांनी येण्या-जाण्यासाठी भाड्याने रिक्षा लावली होती, अशी माहिती नातेवाइकांनी पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे तपास केला असता, महिलेने रिक्षाचालक नसीर बिराजदार याची रिक्षा भाड्याने घेतल्याचे समजले. रोजच्या संपर्कामुळे नसीर आणि महिलेची ओळख वाढली. नसीरचे महिलेवर एकतर्फी प्रेम होते. मात्र, महिलेचा या प्रकाराला विरोध होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. नसीर आणि त्याच्या साथीदाराचा शोध घेतला असता आरोपी विजापूर येथे असल्याचे समजले.
पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदूम, सहायक उपनिरीक्षक तानाजी कांबळे, कर्मचारी संदेश निकाळजे, ऋषीकेश दिघे, स्वाती म्हस्के यांनी विजापूर येथे जाऊन नसीरला अटक केली. प्रेमाला विरोध केल्याने महिलेचा खून केल्याची कबुली नसीरने दिली. खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली. सहायक पोलिस निरीक्षक अमर कदम तपास करीत आहेत
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close