सामाजिक

आणीबाणीत सविंधानाचाअपमान करत कॉंग्रेसची मानसिकता समाजामध्ये फूट पाळण्याची व विकास काम थांबवणे हेच काग्रेस करत आली: आमदार सावरकर

Spread the love

 

 

या काळात कारगृहात जाणाऱ्या जनसंघ चव भाजप च्या कार्यकर्त्याना नमन व आशीर्वाद 

अकोला : स्वातंत्रोत्तर काळातील भारतीय लोकशाहीतील आजपर्यंतचा सर्वात काळा दिवस कोणता आसेल तर 25 जून 1975 ज्या दिवशी संविधानाला पुर्णपणे तिलांजली देवून या देशात काँग्रेस पक्षाच्या सर्वोसर्वा व तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी या देशावर लादलेली आणीबाणी परिणामत: या देशातील लोकशाहीची राजरोसपणे हत्या केली गेली कारण त्यांच्या विरुद्धच्या निवडणुकीच्या खटल्यात दिल्या गेलेल्या निकालामुळे इंदिरा गांधींचे पंतप्रधान पद धोक्यात आले होते पण काँग्रेस पक्षाची जुनीच खोड आहे जेव्हा ते राजकीयदृष्ट्या अडचणीत येतात तेव्हा या देशातील संवैधानिक , सामाजिक , राजकीय सौधार्य बिघडून टाकायचे, लोकांना खोटे सांगायचे खोटे आश्वासणे द्यायचे जसे इंदिरा गांधींनी गरीबी हटाव ची घोषणा केली . तशीच राहुल गांधींनी देखील खटाखाट गरिबांच्या खात्यात एक लाख रुपये देण्याची घोषणा केली केली व सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला अशा तत्त्वापासून सावध राहण्याची गरज असल्याची प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
अकोला भाजपा तर्फे आणीबाणीच्या कालखंडामध्ये नाशिक येथे सजा भोगणारे भाजपा परिवारातील कार्यकर्त्यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा आशीर्वाद व त्यांच्या त्याग बलिदान तपस्या व कोणती अपेक्षा न ठेवता राष्ट्र निर्माण साठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
भाजपा महानगर अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले एडवोकेट विजयराव देशमुख, पुरुषोत्तम खोत विनायक पत्की यांचा निवासस्थानी जाऊन स्वागत केलं याप्रसंगी माजी खासदार श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, खासदार श्री अनुपभाऊ धोत्रे आमदार श्री. वसंतभाऊ खंडेलवाल यांच्या नेतृत्वात आज, जिल्हाध्यक्ष श्री किशोरभाऊ मांगटे पाटील, महानगर अध्यक्ष श्री जयंतराव मसने, श्री. विजयभाऊ अग्रवाल, श्री कृष्णाभाऊ शर्मा, गिरीश जोशी, माधव मानकर, संजय गोटफोडे, रमेश अलकरी, निलेश निनोरे संतोष पांडे, रमेश करिहार, दिलीप मिश्रा तुषार भिरड, सिद्धार्थ शर्मा, अनिल गरड, सतीश ढगे,रवि दुतोंडे संजय झाडोकार, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
येनकेन प्रकारे सत्तेत यायचे आणि खोटे धंदे करुन टिकून राहायचे सत्तेसाठी कोणत्याही थरला जायचे मंग त्यामुळे देशाचे कीतीही नुकसान झाले तरी चालेल ! प्रसंगी देशविरोधी शक्तींना हाताशी धरून , त्यांची मदत घेवून सत्ता टिकवायची , एखाद्या पक्षाला लोकशाही मार्गाने हरविणे कठीण जात आसेल तर देशविरोधी शक्तींना हाताशी धरल्याचे सर्वात मोठे उदा:रण म्हणजे अकाली दलाला निवडणुकीत हरवू न शकणार्‍या इंदिरा गांधींनी भिंदरानवाले सारख्या खालीस्तान वादी फुटीर नेत्याला हाताशी धरून त्याला सर्व प्रकारची रसद पुरवून अकाली दलाची पंजाब मधील सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आज मा. नरेंद्र मोदी यांना निवडणुकीत हरवता येणे शक्य नाही लक्षात आल्यावर श्री राहुल गांधी देखील आजीच्या पावलावर पाऊल ठेऊन देशविरोधी घोषणा देणार्‍या पाकधार्जिण्य तुकडे-तुकडे गॅंग चे जाहीर समर्थन करतांना आपण पाहतो आहे असे किशोर पाटील याप्रसंगी म्हणाले
. तसेच २६ जानेवारीला शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली लाल किल्ल्यावरील तिरंगा झेंडा उतरवून खलिस्तानी झेंडा फडकाविणाऱ्या फुटीरवाद्यांचे समर्थन राहुल गांधी सह सर्वच इंडी आघाडीचे नेत्यांनी केले , सत्तेसाठी आणि मोदी विरोधाने पछाडलेले इंडी आघाडीच्या नेत्यांनी भारतीय राज्य घटनेचा अनेकदा अपमान केला तेच आज राज्य घटना वाचविण्याची भाषा करीत आहे ,
आणीबाणीमध्ये लेखन स्वतंत्र , भाषण स्वतंत्र , विचार स्वतंत्र पुर्णपणे हिरावून घेतले देशातील कामुनिस्ट आणि इंदिरा गांधीचे चाटूकार पक्ष वगळता सर्वच विरोधी पक्षाच्या लहान-मोठया नेत्यांना व राष्ट्रहिताचे काम करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनेचे अडीच लाखाहून अधिक कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आले, जो पत्रकार इंदिरा विरुद्ध लिखाण कारेन त्या पत्रकाराला व त्या प्रेसला प्रचंड त्रास दिला जात व तुरुंगात डांबून यातना देण्यात येत आसे मा. मनमोहन सिंह यांनी देखील जवळपास दहा हजार जणांचे ट्वीटर (आताचे एक्स ) खाते बंद करून कोंग्रेस पक्षाच्या घटनाविरोधी व हुकुमशाही वृत्तीचे दर्शन आजच्या पिढीला करून दिले होते खर म्हणजे आणीबाणीत कोंग्रेस पक्षाने केलेले अत्याचार इंग्रजांनी केलेल्या अत्याचारलाही लाजवेल इतके वाईट होते असे याप्रसंगी विजय अग्रवाल म्हणाले , जयप्रकाश नारायण , अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी,प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे ,एस.एम.जोशी,नितीशकुमार,जॉर्ज फर्नांडिस ई. आनेक दिग्गज व प्रमुख नेत्यांना केवळ आणीबाणीला विरोध केला व संविधनाचे रक्षण व्हावे म्हणून आंदोलने केले म्हणून काँग्रेसपक्षाने कित्तेक महीने जेल मध्ये टाकले आज मात्र हीच काँग्रेस आणि त्यांचे इंडी आघाडीचे नेते भ्रष्टाचारात जेल मध्ये गेलेल्या नेत्यांसाठी धाय मोकलून रडत आहे आता या घटनेला जवळपास ४९ वर्षे झाले पण त्या वेळच्या कॉँग्रेसची मानसिकता आणि आत्ताच्या कॉँग्रेसची मानसिकता सारखीच असल्याचे लक्षात येते असे याप्रसंगी जयंत मसने म्हणाले.
आणीबाणीच्या काळता न्यायव्यवस्था पुर्णपणे इंदिरा गांधीच्या दबावाखाली काम करीत होती एका खटल्यात चार न्यायाधीशांच्या बेंचने निकाल देतांना त्यातील एक न्यायाधीश (जस्टीस) मा.खन्ना यांनी आणीबाणी विरोधी मत नोंदीवले तर जस्टीस खन्ना यांचा मुख्य सरन्याधीश होण्याचा घटनात्मक हक्क असतांना सुद्धा तो कॉँग्रेस सरकारने डावलला आणी अन्य न्यायाधीशास मुख्य न्यायाधीशपदी बसविले, सर्वसामान्य माणसाला संविधानाने दिलेले सर्व हक्क काढून घेण्याचे पाप इंदिरा गांधींनी केले आज तीच कोंग्रेस संविधानाची भाषा बोलत आहे ? असा सवाल सिद्धार्थ शर्मा यांनी केला.
आणीबाणी लागू झाल्या नंतर भारतीय राज्य घटनेतील आर्टिकल 356 चा वापर करून विरोधी राज्य सरकारे बरखास्त केले गेली आजपर्यंत या कलमचा कॉंग्रेस पक्षाने सर्वाधिक म्हणजे 90 वेळा वापर करून जनतेने लोकशाही मार्गाने निवडून दिलेले सरकारे बरखास्त केले , जनतेच्या भावनेचा कोंग्रेस पक्षाने कधीच आदर केला नाही , भारतीय राज्य घटनेने धार्मिक आधारवर आरक्षण देता येणार नाही असे स्पष्ट नमूद केले असतांना तसेच या देशातील सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा आनेक खटल्यांच्या निकालात सांगून सुध्दा मुद्दाम या देशात दोन समाजात कायम भांडण लावत एका समाजाचे लांगूनचालन करत राहणे आणि एका विशिष्ट समाजाचे मते मिळविण्याचा प्रयत्न करण्याचा धंदा सत्तेसाठी काँग्रेस पक्षाने केला आहे आता देखील कर्नाटक , तमिळनाडू या राज्यात घटनेने दीलेले ओबीसी , एस.सी . समाजाचे आरक्षण कमी करून अल्पसंख्यांक समाजाला आरक्षण दीले गेले ते न्ययालयात टिकेल की नाही हा वेगळा प्रश्न आहे पण जसा शहबांनो केस मध्ये काँग्रेस पक्ष वागला तसाच आज वागत आहे भारतीय राज्य घटनेने सर्वांना समान संधी व सर्व संवैधानिक संस्थांचा आदर करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे मात्र काँगेस विशेषत: गांधी घराणे अशा आविर्भावात वावरते की आपला जन्म भारतात सत्ता करण्यासाठीच झाला आहे आपल्या शिवाय अन्य कोणीही भारतात सत्ताच स्थापन करू नये असे काँग्रेसला वाटत असल्याचे माधव मानकर म्हणाले.
, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित घटकासाठी काम करतांना त्याला सत्येत देखील उचित स्थान आसले पाहिजे म्हणून लढा दिला एका अर्थाने सर्वांना समान हक्का देण्याचे काम डॉक्टर आंबेडकरांनी केले मात्र गांधी घराने आपल्या शिवाय कोणाचाच अधिकार नाही आपणच सत्तेत पाहिजे आसे वागत असते त्यासाठी कधी सैन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण कर , कधी न्यायव्यवस्थेवर दबाव टाक तर कधी खोटे आश्वासणे देवून गरिबांची दिशाभूल करणे , खोटा भ्रम निर्माण करून देशात अस्वस्थता निर्माण करण्याची परंपरा आजही कायम आहे विशेषता: 2014 पासून काँग्रेस पक्ष सत्तेसाठी कोणत्याही थरला जात असल्याचे पाहून आसे वाटते की ज्या कॉंग्रेस ने लोक शाहीचा गळा घोटून आणीबाणी आणली ती काँग्रेस सत्तेसाठी देशाचे तुकडे करायला व देशविरोधी कामे करण्यार्‍या शक्तींना जाहीर पाठिंबा द्यायला मागेपुढे पाहत नाही आणि हीच यांची परंपरा आहे , काँग्रेस पक्ष व त्यांचे इंडी आघाडीचे सहकारी सत्ता मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाते हा इतिहास आहे तेव्हा जनतेने वेळीच सावध व्हावे . असे आवाहन यावेळी गिरीश जोशी यांनी केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close