क्राइम

कुऱ्हाडीचे वांर आणि पत्नी ठार 

Spread the love

कारकिन/ नवप्रहार मीडिया 

                  नवरा बायको म्हटले की त्यांच्यात किरकोळ वाद होत असतात. पण कधीकधी किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत तर कधी हा वाद टोकाला गेल्याने अघटीत घडते. असाच प्रकार पैठण पोलीस स्टेशन क्या हद्दीतील कारकीन येथे घडला आहे. येथे ऐका नवऱ्याने बायकोवर कुऱ्हाडीने घाव घालून तिला संपवले आहे. सोनाली ताकवले असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. आरोपी आशीष पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर सोनालीच्या मुलीच्या डोक्यावरून आईचे छत्र हरवले आहे.

                     पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करकिन येथे आशीष रावसाहेब ताकवले (२५) हा पत्नी सोनाली (२२) सोबतब्रहात होता. काल (दि.३) या दोघात कुठल्यातरी गोष्टीवरून वाद झाला. या वादातून पती आतिष ताकवले यांनी आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने गळ्यावर व पोटावर तीन ते चार वार केल्यामुळे पत्नी सोनाली रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. बेशुद्ध पडल्याचे लक्षात येताच तो पळून जाऊन लागला. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे जमादार राजेश चव्हाण यांनी या आरोपीला तत्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, सपोनि निलेश खेळे, जमादार करतासिंग सिंगल यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close