क्राइम

प्रेयसीवर पाच गोळ्या झाडून तो आरामात हॉटेल  बाहेर पडला

Spread the love
हत्या हिंजवडी येथील लॉजवर आणि पकडल्या गेला मुंबईत
 

पिंपरी  / नवप्रहार मीडिया 

 
           हिंजवडी येथील एका ओयो हॉटेल मध्ये रविवारी तरुणीचा मरीतदेह आढळला होता. तरुणीची हत्या तिच्या प्रियकराने केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दोघेही मूळचे राहणारे लखनऊचे असल्याची माहिती समोर आलीय. प्रियकर ऋषभ निगम याने तरुणीवर एक दोन नव्हे तर पाच गोळ्या झाडल्या. तरी याची जराही कुणकुण कोणाला कशी लागली नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय. पाच गोळ्या झाडून तरुण अगदी शांतपणे लॉजमधून निघून गेला. मुंबई पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर खूनचा उलगडा झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, हत्या झालेल्या तरुणीचं नाव वंदना द्विवेदी असं आहे. ती आणि ऋषभ दोघेही लखनऊमध्ये एकाच परिसरात राहतात. त्यांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंधही होते. सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारी वंदनी दोन वर्षांपासून हिंजवडीत नोकरी करत होती.
ऋषभ गुरुवारी लॉजमध्ये गेला होता. त्यानंतर शुक्रवारी वंदना त्याच्यासोबत गेली. शनिवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास ऋषभने वंदनावर गोळीबार केला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर ऋषभने तिथून पळ काढला. गोळीबारानंतर ऋषभ शांतपणे तिथून बाहेर पडला. तो मुंबईला गेला.

ऋषभकडे पिस्टल होते आणि त्यासाठी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशी करण्यात आली. तेव्हा ऋषभने वंदनाचा खून केल्याचं सांगितलं. यानंतर मुंबई पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलिसांना माहिती दिली. या माहितीनंतर हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.

हिंजवडी पोलिसांनी वंदनाच्या कुटुंबियांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तसंच वंदना आणि ऋषभ यांच्याबाबत विचारले. मात्र कुटुंबियांकडून याबाबत काहीच सांगण्यात आले नाही. तर ऋषभने गुन्ह्याची कबुली दिली आहे. दोघांमध्ये काही कारणाने वाद झाला होता अशी माहिती समजते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close