क्राइम

लॉज वर सापडलेल्या तरुणीने तोंड उघडताच पोलीस झाले अवाक 

Spread the love

जळगाव  / विशेष प्रतिनिधी 

            जळगाव – भुसावळ मार्गावर असलेल्या हॉटेल चित्रकूट मध्ये देहव्यापार चालत असल्याची माहिती जळगाव पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी ताफ्यासह सदर लॉज वर धाड टाकली . त्यावेळी त्यांना तेथे एक तरुणी आणि दोन तरुण आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. तरुणीने तोंड उघडताच पोलीस अवाक झाले. 

               वास्तविक ही तरुणी बांगलादेशी नागरिक असून ती येथे अवैधरित्या राहत होती.बांगलादेशी तरुणीकडे अधिकृत पासपोर्ट आणि भारतात येण्यासाठी आवश्यक व्हिसासह कोणतीही कागदपत्रे नसल्याचं पोलिसांना आढळलं. जळगाव ते भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल चित्रकोटमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी हॉटेल चालक, व्यवस्थापक आणि त्यांना मदत करणाऱ्या तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी या चौघांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. त्यानंतर ही मुलगी भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचं समोर आलं. तिच्याकडे कोणत्याही प्रकारची अधिकृत कागदपत्रे नव्हती. त्याचवेळी त्यांच्या मदतीने पोलिसांनी आणखी एका वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे.

आणखी एका कारवाईत हॉटेल चित्रकोट येथून अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची चौकशी करून जळगाव पोलिसांनी एका हॉटेलमधून एका महिलेला आणि जवळच्या हॉटेल यशमधून आणखी एका तरुणीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी व्यवस्थापक नीलेश राजेंद्र गुजर, चेतन वसंत माळी, विजय सखाराम तायडे यांना अटक केली आहे.

जळगाव पोलिसांनी बांगलादेशी तरुणीसह अन्य एका महिलेला आशादीप वसतिगृहात पाठवलं आहे. लॉजमध्ये सापडलेली मुलगी बांगलादेशची राजधानी ढाका येथील रहिवासी आहे. महिलेकडे अधिकृत पासपोर्ट, व्हिसा आणि भारतात येण्यासाठी लागणारे अन्य कोणतेही कागदपत्र नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close