क्राइम

अल्पवयीन मेहुणी आणि दाजीने विष प्राशन करून संपवले जिवन 

Spread the love

अनैतिक संबंध घटनेसाठी कारणीभूत असल्याची चर्चा

नवी दिल्ली  / नवप्रहार डेस्क 

 काहीवेळा प्रेम असं काहीतरी वळण घेतं, की क्षणात सगळंच उद्धवस्त होऊन जातं. प्रेमात माणूस चूक आणि बरोबर यातला फरक विसरून कधीकधी टोकाचं पाऊलही उचलतो. अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

नोएडाच्या इकोटेक 3 पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी रात्री मेहुणी आणि दाजीने विषारी द्रव्य प्राशन केलं. यानंतर दोघांनाही गंभीर अवस्थेत नोएडा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एडीसीपी सेंट्रल हिरदेश कठेरिया यांनी सांगितलं की, मथुराचा रहिवासी असलेला 24 वर्षीय धर्मेंद्र हबीबपूर गावाच्या टाकीजवळ टॉवर स्ट्रीटमध्ये भाड्याने राहत होता. त्याच्यासोबत त्याची अल्पवयीन मेहुणीही राहत होती. दोघांनीही विषारी द्रव्य प्राशन केलं

यानंतर दोघांची प्रकृती बिघडू लागल्यावर हबीबपूर गावात राहणाऱ्या घरमालकाने दोघांनाही रुग्णालयात दाखल करून पोलिसांना माहिती दिली. दोघांचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. ते दोघेही शुक्रवारी भाड्याने राहायला आल्याचे घरमालकाने सांगितले. पोलीस मुलीच्या कुटुंबीयांशी बोलले असता त्यांनी सांगितलं की, दोघेही नात्याने एकमेकांचे दाजी आणि मेहुणी लागतात. एडीसीपी यांनी सांगितलं की, मृत धर्मेंद्रने आपल्या अल्पवयीन मेहुणीला आमिष दाखवून मथुरा येथून ग्रेटर नोएडा येथे आणलं होतं.

तरुणाने हबीबपूर गावात भाड्याने घर घेतलं आणि त्यात त्याच्या अल्पवयीन मेहुणीसोबत राहू लागला. रात्री उशिरा दोघांनीही विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
3

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close