शाशकीय

नगर परिषदेच्या नियोजनाअभावी  नागरिकांना होतोय कमालीचा मनस्ताप 

Spread the love
ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू असल्याने तीन ठिकाणी हलविण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्र
गर्भवती महिला आणि वयोवृद्धांना घ्यावे लागते हेलपाटे
नागरिकांत कमालीचा असंतोष 
वरुड / प्रतिनिधी 
            तालुक्यातील शेंदूरजना घाट येथे ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू असल्याने त्याठिकाणी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र इतर ठिकाणी हलवताना नगर परिषदे कडून योग्य नियोजन न केल्या गेल्याने नागरिकांना कमालीचा तरस सोसावा लागत आहे. वयोवृद्ध आणि गर्भवती महिलांना उपचारासाठी तीन ठिकाणी चकरा माराव्या लागत असल्याने नागरिकांत कमालीचा असंतोष पसरला आहे.
            शेंदूरजना घाट येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ग्रामीजलन रुग्णालय मंजूर झाले असून सध्या ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र जुन्या ठिकाणावरून हलविण्यात आले आहे. पण तसे करतांना नगर परिषदे कडून योग्य नियोजन करण्यात आल्याचे दिसून येत आहे.  प्राथमिक आरोग्य केंद्र नियोजनाअभावी तीन भगत विभागोय गेले आहे. आणि ते ही गावाच्या तीन कोपऱ्यात.
            लसीकरण गव्याचे गोठाणात , दवाखाना बालापेठ  तर भरती वॉर्ड बस स्टँड जवळ असलेल्या कम्युनिटी हॉल येथे शिफ्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पावती एका ठिकाणी लाईकरं एका ठिकानी तर भरती तिसऱ्या ठिकाणी असा कार्यक्रम सुरू असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच ठिकाणी उपचाराची सोय न.प. ने उपलब्ध कायुन द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close