क्राइम

पती करत होता बलात्कार तर पत्नी देत होती घराबाहेर पहारा

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी

           ब्युटी पार्लर शिकण्यासाठी जात असलेल्या २२ वर्षीय तरुणीवर ब्युटी पार्लर चालक महिलेच्या पतीकडून बलात्कार करण्यात आल्याचा आणि हा प्रकार वारंवार झाल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. लक्षणीय बाब अशी की पती मुलीचे लैंगिक शोषण करीत असताना पत्नी घराबाहेर पहारा देत होती. यात आरोपीचा भाऊ देखील त्याला मदत करत असल्याचे समोर आले आहे.  या प्रकरणी पीडितेनं तक्रार दाखल करताच पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

शरीफ खान आणि यास्मीन खान असं अटक केलेल्या आरोपी दाम्पत्याचं नाव आहे. अन्य एकालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिघांची कसून चौकशी केली जात आहे.नेमकं प्रकरण काय आहे?

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती मुख्य आरोपी शरीफ खानची पत्नी यास्मीन हिच्याकडे ब्युटी पार्लरचं काम शिकण्यासाठी जात होती. यामुळे तिचं आरोपीच्या घरी येणं-जाणं होतं. महिन्याभरापूर्वी जेव्हा ती यास्मीनच्या सांगण्यावरून तिच्या घरी गेली, तेव्हा तिथे शरीफ खान एकटाच होता. त्याने संधी साधून तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केला. तिने आरडाओरडा केल्यावर तिला जीवे मारण्याची आणि समाजात बदनाम करण्याची धमकी दिली.

पीडितेने हा प्रकार यास्मीनला सांगितला, तेव्हा यास्मीनने पतीला रोखण्याऐवजी पीडितेवरच दबाव टाकला. “कोणाला काही बोलू नकोस, नाहीतर बदनामी होईल,” असं सांगून ती स्वतः घराबाहेर पहारा देऊ लागली आणि शरीफ आतमध्ये तरुणीवर अत्याचार करायचा.विरोध केल्याने सत्य आलं समोर

शनिवारी दुपारी ४ वाजता शरीफने पुन्हा एकदा बदनामीची भीती दाखवून तरुणीला घरी बोलावलं. यावेळी तिथे त्याची पत्नी यास्मीन आणि भाऊ मुबीन उपस्थित होते. त्यांच्या देखतच शरीफने तिला खोलीत ओढलं. मात्र, यावेळी पीडितेने हिंमत दाखवून कडाडून विरोध केला. तिने आरोपीला जोरात धक्का दिल्याने तो खाली पडला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली.कुटुंबीयांनी रंगेहात पकडले

या घटनेची कुणकुण पीडितेच्या नातेवाईकांना लागताच तिची आई, वडील, भाऊ आणि काका यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तरुणीची नराधमाच्या तावडीतून सुटका केली. कुटुंबीयांना पाहताच आरोपी शरीफ खान पळू लागला, यादरम्यान त्याला दुखापतही झाली.

घटनेची माहिती देताना कँट पोलीस स्टेशनचे अधिकारी म्हणाले की, पीडितेच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात मदत करणाऱ्या पत्नी आणि भावासह मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटनेचा तपास केला जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close