हटके

पती जायचा कामा निमित्ताने बाहेर आणि ती प्रियकराला बोलवायची घरी 

Spread the love

जमुई  / नवप्रहार डेस्क 

 देशात अनैतिक संबंधांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. प्रत्येक दिवशी विविध प्रकारच्या घटना समोर येत आहेत. याच अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्येच्या घटनाही घडत आहेत.

                 पुरुषच बाहेर खयाली असगात असे नाही तर महिला देखील बाहेर खयाली असतात. पुरुष फक्त बदनाम आहेत प्रेमाच्या बाबतीत महिला देखील मागे नाहीत. त्यांना एखादा पुरुष आवडला की मग त्या साम , दाम, दंड भेद वापरून त्याला आपले करतात. या घटनेत देखील या महिलेचा पती कामानिमित्त बाहेर जात असल्याने पती बाहेर गेला की ती आपल्या प्रियकराला बाहेर बोलवायची. ही बाब शेजाऱ्यांना माहीत झाल्यावर त्यांनी यांना रंगेहाथ पकडले आणि मग त्यांच्या सोबत खूपच वाईट केले..

एक दिवस जेव्हा हा प्रियकर आपल्या विवाहित प्रेयसीच्या घरी तिला भेटायला पोहोचला त्यावेळी गावकऱ्यांची नजर त्याच्यावर पडली आणि मग गावकऱ्यांनी या दोन्ही जणांची फार वाईट अवस्था केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

ही घटना जमुई जिल्ह्यातील खैरा पोलीस ठाणे हद्दीतील गोसाईडीह गावातील असल्याचे सांगितले जात आहे. गोसाईडीह गावातील एक महिलेचा पती बाहेर गावी राहून काम करायचा. मात्र, पती घरी नसताना ही महिला आपल्या प्रियकराला घरी बोलवायची. प्रियकरही गूपचूप महिलेच्या घरी पोहोचायचा. एक दिवस गावकऱ्यांनी या दोघांना रंगेहाथ पकडले आणि जोरदार मारहाण केली.

कुणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल करुन दिला. हा व्हिडिओ लोकल18 च्या टीमकडे आहे. मात्र, लोकल18 या व्हिडिओबाबत कोणताही दावा करत नाही. असे सांगितले जात आहे, हा व्हिडिओ 10 दिवस जुना आहे.

असं जुळलं सूत –

गावकऱ्यांनी सांगितले की, महिला कोणत्यातरी कामाच्या निमित्ताने नियमित कोर्टात जायची. त्याच ठिकाणी काम करणाऱ्या मलयपूर येथील एका तरुणासोबत तिचा संवाद झाला आणि दोघांमध्ये प्रेम झाले. या दोघांमध्ये प्रेम झाल्यानंतर हे दोन्ही जण एकमेकांच्या जवळ आहे आणि पतीच्या बाहेर राहण्याच्या फायदा घेत महिला त्याला आपल्या घरी बोलवायची. हा सर्व प्रकार अनेक दिवस चालत राहिला. एक दिवस गावकऱ्यांनी दोघांना पकडले आणि त्यांना जोरदार मारहाण केली.

असे सांगितले जात आहे की, या घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली होती. मात्र, दोन्ही बाजूच्या वतीने कोणतीही लिखित तक्रार करण्यात आलेली नाही. समझौता केल्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आले. पोलिसांनी याबाबत कोणताही दावा केलेला नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close