हटके

द बर्निंग कार चा थरार ; दोघांचा होरपळून मृत्यू

Spread the love

नोएडा / नवप्रहार मीडिया

                         वाहनाला अचानक आग लागणे हा प्रकार त्या वाहनातील तांत्रिक गडबडी मुळे घडतो.पण जेव्हा हा प्रकार घडतो तेव्हा वाहनातील लोकांना जीव वाचविण्याची क्वचितच संधी मिळते. कारण वाहनात तांत्रिक बिघाड आल्यानंतर त्याची तांत्रिक सिस्टीम बिघडते आणि वाहानाचे दार आपोआप लॉक झाल्याने आतील लोकांना बाहेर पडणे दुरापस्त होऊन बसते आणि त्यात त्यांना मृत्यू घेरतो. नोएडाच्या सेक्टर ११९ मधील आम्रपाली प्लॅटिनम सोसायटीजवळ अशीच घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री अचानक धावत्या कारला आग लागली. या भीषण आगीमुळे कारमधील दोघांचा होरपळून मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र कारमध्ये अडकलेल्या दोघांना वाचवण्यात यश आलं नाही. कारमध्ये होरपळून मृत्यू झालेल्यांची ओळख पटलेली नाही. त्यासाठी सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

आम्रपाली प्लॅटिनम सोसायटीत कारला आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. त्यातले दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर फॉरेन्सिक टीमला बोलावले असून गाडीची आणि मृतांची ओळख पटवण्याचे काम केले जात आहे.

स्थानिक पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज तपासले आहे. त्यात ६ वाजून ८ मिनिटांनी गााडी सोसायटीत पोहोचली असल्याचं दिसलं. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांनी म्हणजेच ६ वाजून ११ मिनिटांनी गाडीला आग लागली. गाडीला आग लागली तेव्हा गाडीत असलेल्या दोघांना बाहेर पडता आले नाही. ते आतच होरपळले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close