शैक्षणिक
मुख्याध्यापक झाले आक्रमक…. धरणे आंदोलन करून दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

वर्धा / आशिष इझनकर
वर्धा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ संलग्नित अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक सयुक्त महामंडळ पुणे विदर्भ मुख्याध्यापक संघ ,(सहभागी संस्थाचालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी) यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आज मंगळवारी दिनांक 6/8 / 2024 ला दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले
या आंदोलनाला अनेक पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले मुख्याध्यापकांना रस्त्यावर येऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी व शालेय समस्या करिता आंदोलन करावे लागते यापेक्षा शोकांतिका कोणती? असे स्पष्ट करण्यात आले. या संदर्भात विविध नारे घोषनाबजी करण्यात आली
त्यानंतर सर्व मुख्याध्यापकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी यांना विविध मागणीच्या संदर्भात निवेदन दिले
वर्धा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सतीश जगताप संस्थाध्यक्ष योगेश खोडे अशोकराव झाडे रविभाऊ शेंडे अजय वानखडे मिलिंद सालोडकर प्रमोद खोडे प्रदीप गोमासे मिलिंद मुळे नूतन मालवी पद्मा तायडे जयश्री कोडगिरवार ममता दंडारे इश्ररत खान आदींनी निवेदन दिले
राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध शैक्षणिक समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी वर्धा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आक्रमक झाला आहे. शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज ६ ऑगस्टला येथील जिल्हाधिकारी कार्यालय जवळ हे आंदोलन झाले
राज्यातील अशंतः अनुदानीत, विनाअनुदानीत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रचलीत धोरणानुसार अनुदान टप्पा तात्काळ लागू करावा.
1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व 1 नोव्हेंबर 2005 नंतर अनुदानावर आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना जुनी पेंशन योजना लागू करावी.. शा.नि. 15 मार्च 2024 चा सुधारीत संच मान्यता शासन निर्णय रद्य करुन शाळा तेथे मुख्याध्यापक पद हे धोरण असावे. शा.नि. 15 मार्च 2024 वर्ग 5 वी व 8 वी च्या वर्गाचा दर्जावाढ निर्णय तत्काळ रद्द करावा.
शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी भरती तत्काळ करावी. राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना कॅशलेस मेडीकल योजना तत्काळ लागू करावी.
01 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना जुनी पेंशन
योजना लागू करावी.
वाढीव टप्पा अनुदान शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना त्वरीत मंजुर करण्यात यावा.शासन निर्णय दि. १५ मार्च २०२४ रद्द करण्यात यावा आणि संचमान्यता सुधारीत करुन जुन्या प्रमाणे करण्यात यावी. संचमान्यता त्रुटी प्रस्ताव, प्रलंबीत प्रस्ताव सुधारीत करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी यांना देऊन त्वरीत प्रकरणे निकाली काढण्यात यावी.वेतनेत्तर अनुदान सातव्या वेतन आयोगाप्रमाणे १०% मंजुर करण्यात यावे. सद्यस्थितीत पाचव्या वेतन आयोगानुसार शाळांना ५% अनुदान तुटपुंजे आहे आणि तेसुद्धा पुर्णपणे मिळत नाही.
थकबाकी मिळण्याबाबत.शाळा तिथे मुख्याध्यापक पद मंजुर करण्यात यावे. मुख्याध्यापक शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांना १०-२०-३० वर्ष आश्वाशीत प्रगती योजना मंजुर करण्यात यावी.अंशतः अनुदानीत शाळांचे मुख्याध्यापक पद संचमान्यतेत दर्शविण्याबाबत. संचमान्यतेत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मंजुर पदे दर्शविण्यात यावी.
१९०१ हेड १००% अनुदानीत होऊनही त्या शाळांना वेतनेत्तर अनुदान मिळत नाही ते मंजुर करण्यात यावे. वेतन अनुदान १९०१ हेड मधील शाळांचे नॉनप्लान शाळांमध्ये रुपांतर करण्यात यावे. अंशतः अनुदानीत शाळेचे वेतन वेळेवर व्हावे.. विभागातील सर्व शाळांना आयसीटी लॅब उपलब्ध करुन देण्याबाबत.
आदी अनेक मागण्याचा समावेश आहे.
या आंदोलनात वर्धा जिल्ह्यातील सर्व सर्व मुख्याध्यापक जुनी पेन्शन योजनेचे सर्व पदाधिकारी
जिल्हाध्यक्ष सतीश जगताप सचिव मिलिंद सालोडकर कोषाध्यक्ष प्रदीप गोमासे उपाध्यक्ष मिलिंद मुळे वीरेंद्र मुळे विशाखा लोहवे अर्चना मुळे नूतन माळवी संजय नांदे ममता दंडारे योगेश्वर कलोडे अनिल तडस प्रसाद चंदावर विजय चौधरी अतुल देवडे डॉक्टर ईसरत उल्ला खान प्रभाकर टेकाडे प्रताप चरडे गजानन पोले राजेश सोळंकी विनोद कहारे साहेबराव अवथले नरेशचंद्र वाळके शेषराव बिजवार रामेश्वर लांडे गजानन पोले आदी सर्व पदाधिकारी
व सदस्य वर्धा जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक
व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी झाले होते
सभेचे संचालन अतुल देवढे यांनी केले
प्रास्ताविक मिलिंद सालोडकर यांनी केले
तर आभार प्रदीप गोमासे यांनी मांनले.