हटके

प्रेयसी तसे करू देत नाही म्हणून तिच्या सव्वा वर्षाच्या बाळाला उकळत्या पाण्यात टाकून मारले

Spread the love

                प्रियकर आणि प्रेयसीत रुसवे फुगवे हे चालतच असतात. लहान मोठे भांडण ही काही नवीन गोष्ट नाही. अनेक वेळा प्रेयसी प्रियकराला सल्ला देखील देत असते. अशीच एक विवाहित प्रेयसी विवाहित प्रियकराला बायको सोबत राहण्याचा सल्ला देत होती. पण प्रियकर तिला तसले करू देण्यासाठी दबाब टाकत होता. प्रेयसी नकार देत होती. त्यामुळे संतापलेल्या प्रियकराने तिच्या सव्वा वर्षाच्या बाळाला गरम पाण्यात टाकून मारले. 

पुणे / नवप्रहार न्यूज नेटवर्क

या घटनेप्रकरणी बाळाच्या आईने चाकण पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार विक्रम शरद कोळेकर रा. कोयळी ता. खेड जि. पुणे नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्याला अटक झालेली नाही. त्याचा शोध चाकण पोलीस घेत आहेत. अनैतिक संबंधातून आरोपी विक्रमने बाळाला जीवे मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विक्रम आणि तक्रारदार महिलेचे प्रेमसंबंध होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा एप्रिल रोजी प्रियकर आरोपी विक्रम हा प्रेयसीच्या घरी गेला. प्रेयसीची मानलेली बहीणदेखील घरी उपस्थित होती. फोन आला म्हणून ती घराबाहेर गेली. याचदरम्यान बाथरूमध्ये बकेटीत असलेल्या उकळत्या पाण्यात अवघ्या सव्वा वर्षीय चिमुकल्या बाळाला क्रूरतेने बुडवून गंभीररीत्या जखमी केले. मग, विक्रमने प्रेयसीचा गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली.

बाळाचा रडण्याचा आवाज बाहेर आल्याने मानलेली बहीण आत गेली. तिलादेखील आरोपी विक्रमने धमकावत घडलेली घटना कुठे सांगू नकोस असे संगितले. चिमुकल्या बाळाचे हात, पाय, डोके, पाठ गंभीररीत्या भाजले होते. तातडीने त्यास खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांना पुण्यातील रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. पंधरा दिवसांच्या उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला. अत्यंत भेदरलेल्या स्थितीत असलेल्या बाळाच्या आईने या प्रकरणी चाकण पोलिसात तक्रार दिली आहे. अद्याप आरोपी मोकाट असून त्याचा शोध चाकण पोलीस घेत आहेत.

प्रेयसी प्रियकराला पत्नीसोबत संसार कर म्हणून सांगायची!

मृत्यू झालेल्या बाळाच्या आईचे आणि आरोपी विक्रमचे प्रेमसंबंध होते. परंतु, तू तुझ्या पत्नीसोबत राहा, चांगला संसार कर, असे वारंवार ती विक्रमला सांगायची. शारीरिक संबंधास नकार देत होती म्हणून त्याने प्रेयसीच्या बाळाचा जीव घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. प्रेयसी असलेल्या महिलेचादेखील विवाह झालेला असून ती पतीसोबत राहात नाही.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close