क्राइम

बाजार समिती च्या माजी सभापती सह १७ जणांवर फसवणूकीचे गुन्हे दाखल

Spread the love

न्यायालयाने दिले आदेश. शेतक-याच्या कापूस स्वस्वार्थासाठी स्वत:च्या नावे विकल्याचा आरोप*

आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता*

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार

शेतकरी वर्गास लाभ व्हावा व शेतकऱ्यांना सोईचे जावे यासाठी सी.सी.आय मार्फत कापुस खरेदी करून शेतकरी हीत साधल्या जाते. घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती व त्यांच्या सहकाऱ्यांनी मात्र शेतकरी कापुस कमी दरात खरेदी करून चक्क सी.सी.आय ला विकला.सदर प्रकार बाजार समितीच्या कुणाच्या शक्कलेतून केला हे मात्र गुपित असून त्यात १७ जणांवर फसवणूक केल्या बाबत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आदेशा नुसार फसवणूक केल्या बदल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात बाजार समिती माजी सभापती अभिषेक श. ठाकरे,विजय वी.कडू,भारत ल‌. पोतराजे,अक्षय अ. गोडे,गजानन ना यमसनवार, संदीप वी. राउत,सुहास ग. यमसनवार,अशोक ना यमसनवार,अनिल श्रा गोडे, शआबूदीन लालाणी,गजानन ल. ढवळे, सुभाष ब. जाधव, श्रीकांत रा. वाजपेयी, मोहन वा घोडाम, सुधाकर भंडारवार, शंकर ल. चूनारकर,दिगंबर वी. ककण, अशा गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपी नावे आहे. सदर आरोपींनी स्वस्वार्थासाठी शेतकरी वर्गापासून कमी दरात कापूस घेऊन ज्यास्त दरात सी सी आय ला विकला. हे सर्व गौडबंगाल माहीतीच्या आधारावर आयूनूदुन सोळंकी यांनी दाखल केलेल्या माहितीनुसार उघड झाले. या प्रकरणात आरोपीं मते २०२० मधे गठीत करण्यात आलेल्या पालक मंत्री समितीच्या चौकसिमधे दिलेल्या माहितीनुसार सदर ‌विक्री कापुस त्यांचे मक्ता व केलेल्या शेतीत उत्पादीत होता पण, वास्तविकता हा कापुस उत्पादन पिक व विक्रीत आलेला कापुस यात भल्लीमोठी तफावत असल्याचे दिसून आले त्यात हा गोंधळ उघड झाला. यावर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आदेशा नुसार विविध कलमान्वये ४२०, फसवेगिरी,४४६,४६८,४६९,४७१ अन्वे गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात १७ आरोपी व्यतिरिक्त इतर काही जण समाविष्ट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. प्रकरणाचा तपास घाटंजी ठाणेदार निलेश सुरडकर व पोलिस करत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close