ब्रेकिंग न्यूज

कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना शिंदे व राष्ट्रवादीचा झेंडा बीजेपी व मनसेने खातेही उघडले नाही

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष भाऊराव ढवळे यांचा पराभव, विश्वर चिट्टीने अजमावले उमेदवारांनी नशीब.

Spread the love

नेर प्रतिनिधी / नवनाथ दरोई

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत शिवसेना शिंदे, राष्ट्रवादीला दहा तर उध्दव ठाकरे काॅग्रेस आठ जागी विजयी झाले. या निवडणुकीत अन्न व औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड व माजी क्रीडा रांज्यमंत्री संजय देशमुख यांची प्रतिष्टा पनाला लागली होती.
नेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा संचालक मंडळाच्या पदासाठी शुक्रवारला सकाळी आठ ते दुपारी चार या वेळात मतदारांनी मतदानची भुमिका पार पाडली. मतदानाच्या वेळेत अनेक नेत्यांनी मतदान केंद्रावर भेटी दिल्या.सायंकाळी सहा वाजता सुर्योदय मंगल कार्यालयात मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. सर्व निकाल रात्री बाराच्या दरम्यान बाहेर आले.या निवडणुकीत शेतकरी सहकार आघाडीचे उद्धव ठाकरे व काँग्रेसचे दिलीप तीमाने, निखिल जैत, गोपाल चव्हाण, परसराम गावंडे, प्रदीप भगत, महिला राखीव सुनिता ठाकरे, सहकार संस्था, गजानन महाल्ले, बाबाराव राठोड तर शिंदे राष्ट्रवादिचे व्यापारी मतदारसंघातून, गुड्डू लोढा,विष्णू राठोड, हमाली मापारी मतदारसंघातून, पंकज गुल्हाने, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमातीतून नरेंद्र डवरे, ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल, रवींद्र राऊत, ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण मनोज नाल्हे, प्रमोद राठोड, सर्वसाधारण सहकार संस्था, प्रशांत मासाळ, सहकार संस्था महिला राखीव मनीषा गावंडे, केशव सोळंके विजयी झाले. या निवडणूकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष भावराव ढवळे यांचा दारुण पराभव झाला. भाजपने व मनसेने स्वताचे खाते उघडले नाही. या निवडणुकीचे निर्णय अधिकारी म्हणून नेर तहसील चे तहसीलदार शिवाजी मगर यांनी काम पाहिले. निवडणूक निरिक्षक म्हणून नरेंद्र थोटे यांनी भुमिका बजावली.

What’s your Reaction?
+1
1
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Sumit Baniya

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close