हटके

चार मुलींचा बाप असलेल्या पित्याला 15 वर्षां नंतर समजले की त्या त्याच्या मुली नाहीत 

Spread the love
 

नवी दिल्ली / नवप्रहार वृत्तसेवा 

                      अपत्य झाल्यानंतर आई वडिलांना एक वेगळाच आनंद होतो. कारण अपत्य प्राप्ती नंतर त्या दोघां सोबत तिसरा व्यक्ती येतो जो त्यांच्या साठी आंनदी आणि आल्हाददायक वातावरण तयार करणार असतो. कोणाला एक दोन नाही चार चार अपत्य होतात. आणि लग्नाला 15 वर्ष झाल्यानंतर पुढच्याला जर हे माहीत झाले की ते चारही अपत्य त्याचे नाहीत तर त्याच्या जिवावर काय बेतेल हे त्याचे त्यालाच माहीत. असाच एक विचित्र प्रकार चायना येथील आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, लग्नाच्या 15 वर्षानंतप व्यक्तीला त्याची पत्नी आपली फसवणूक करत असल्याचं समजलं. लग्नाच्या सुरुवातीपासून ती नवऱ्याची फसवणूक करत होती. त्याला चार मुली असूनही तो त्यांपैकी कोणाचाही बाप नव्हता. हे प्रकरण जिआंगशी प्रांतातील असून डिसेंबरमध्येच या जोडप्याच्या घटस्फोटाबाबत सुनावणी झाली होती.

चेन आणि यू असं या नवरा बायकोचं नाव असून हे प्रकरण सध्या सर्वांचं लक्ष वेधत आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान चेनच्या वकिलानं सांगितलं की, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याची पत्नी यू हिने चौथ्या मुलीला जन्म दिला. पत्नीच्या प्रसूतीच्या वेळी वू नावाचा व्यक्ती तेथे आला होता, त्यानंतर पतीला त्याच्यावर संशय आला. त्यांना पहिल्या ती मुली होता ज्यांचा जन्म 2008, 2010 आणि 2018 मध्ये झाला होता. 2022 मध्ये चेन आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू झाला, जेव्हा त्याला त्याच्या पत्नीचं कांड समजलं. डीएनए चाचणीनंतर या मुली त्याच्या नसल्याचं सत्य उघड झालं.

बायको आपल्याला फसवत आहे हे समोर येतात नवऱ्याला धक्का बसला आणि 15 वर्षाच्या लग्नाचा काडीमोड झाला. हे प्रकरण खूपच धक्कादायक असून सध्या चांगलंच चर्चेत आलंय.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close