क्राइम

मुलांना रडत सोडत चॅटिंग मध्ये गुंग असलेल्या बायकोला नवऱ्याने संपवले

Spread the love

मुंबई / नवप्रहार न्यूज नेटवर्क

             अँड्रॉइड  मोबाईल आल्यापासून  अनेक कामे मोबाईल च्या माध्यमातून करणे सोपे झाले आहे. पण म्हणतात न की ज्या गोष्टीचे फायदे आहेत त्याचे तोटे देखील आहेत.मोबाईल च्या बाबतीतही तसेच म्हणता येईल कारण मोबाईल चे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. मोबाईल मुळे ‘ लफडयांचे ‘ प्रमाण देखील वाढले आहे. लफडयात असलेल्या लोकांना मोबाईल वर चॅटिंग करतांना आजूबाजूला काय होत असते याचे भान नसते. अशीच एक घटना महानगर मुंबई मध्ये घडली आहे.

                पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गोपाळ मिस्त्री चाळ एकेरी नगर येथे सुरेश विश्वकर्मा नावाचा व्यक्ती आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. सुरेश पेशाने सुतार होता. कामावरन तो उशिरा घरी परतत होता. सुरेश चा एक मित्र होता. सुरेश च्या घरी त्याचे जाणे येणे होते. त्यामुळे सुरेशच्या  बायको सोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. सुरेशला शेजाऱ्यांनी या बद्दल सांगितले होते. सुरेश ने बायकोला समजावून

         घटनेच्या दिवशी सुरेश कामावरून रात्री 11 ते  11.30 च्या दरम्यान घरी आला असता त्याला मुलं रडताना आढळले. त्यावेळी बायको मोबाईल वर  त्याच्या मित्रासोबत चॅटिंग करीत असल्याचे दिसले.यावरून दोघात कडाक्याचे भांडण झाले.  रागाच्या भरात सुरेश ने जवळची कैची उचलून बायकोच्या मानेत खुपसली त्यात तिचा मृत्यू झाला. यानंतर सुरेश बाहेर पळत गेला आणि त्याने शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावल. माझा मित्र बायकोवर हल्ला करुन पळून गेला”असं त्याने सांगितलं. “जखमी महिलेला सायन हॉस्पिटल येथे नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केलं” असं पोलिसांनी सांगितलं.

हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी लगेच शाहू नगर पोलिसांना या बद्दल माहिती कळवली. त्यांनी विश्वाकर्माची चौकशी सुरु केली. पोलिसांनी चौकशी सुरु केल्यानंतर सुरेश विश्वाकर्माच्या उत्तरात विसंगती दिसून आली. त्यांच्या कॉमन मित्राला सुद्धा चौकशीसाठी बोलावलं. त्याचे सुरेशच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. चौकशीअखेर सुरेशने त्याचा गुन्हा कबूल केला. त्याला आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत अटक करण्यात आलीय” वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी ही माहिती दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close