मनोरंजन दुनिया

जगप्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह आढळला तिच्या घरात 

Spread the love

                  वयाच्या अवध्या 24 व्या वर्षी जगप्रसिद्ध अभिनेत्री किम से रॉन हिचे निधन झाले आहे. तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळला आहे. मृत्यूचे कारण अद्याप अष्पष्ट आहे. 16 फेब्रुवारी रोजी ही घटना उघडकीस आली.

पोलिसांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, किम से रॉनचा मृतदेह सोलमधील सोंगडोंग-गु येथील त्याच्या घरात आढळला. अभिनेत्रीच्या ओळखीच्या कोणीतरी सायंकाळी 4.50 वाजता आपत्कालीन सेवेला माहिती दिली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीच्या पोलीस तपासात कोणताही कट उघडकीस आलेला नाही. या प्रकरणात पोलिसांना कोणत्याही गुन्हेगारी कारवायाचा संशय नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

चोसुन बिझच्या अहवालानुसार, पोलीस अधिकाऱ्याने एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘किमच्या मृत्यूमध्ये आतापर्यंत कोणत्याही बाह्य हल्ल्याचे किंवा गुन्हेगारी कारवायांचे कोणतेही संकेत नाहीत, परंतु मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू आहे.’

किमच्या चाहत्यांना माहित आहे की ती अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये दिसली आहे. किम से रॉन ‘ब्लडहाउंड्स’, ‘लीव्हरेज’, ‘मिरर ऑफ द विच’, ‘टू बी कंटिन्युड’ आणि ‘हाय स्कूल – लव्ह ऑन’ सारख्या शोसाठी ओळखली जात होती. अशा अनेक मालिकांमध्ये तिच्या पात्रांना चांगलीच पसंती मिळाली. अभिनेत्रीच्या अचानक निधनाने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Back to top button
Close
Close