हटके

‘ अनोख्या ‘  मैत्रीचा शेवट ही  ‘अनोखा ‘ 

Spread the love

लातूर / नवप्रहार मीडिया नेटवर्क

               जगात सगळ्यात पवित्र नाते हे मैत्रीचे असते. कारण यात जात – पात, लिंगभेद , गरीब -श्रीमंत या गोष्टीला काही वाव नसतो. अगदी झऱ्याच्या पाण्यासारखे स्वच्छ आणि निखळ नाते हे मैत्रीचे असते.याच मैत्रीच्या नात्यातून ही अनोखी घटना समोर येत आहे.अनोख्या मैत्रीच्या अनोख्या घटनेबद्दल ची हकीकत अशी.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तीन मित्र लातूरमध्ये एकाच हॉटेलात काम करत होते. त्यापैकी दोन मित्रांचा अपघातात मृत्यू झाला. आपल्या दोन मित्रांचा अपघातात मृत्यू झाला, याची बातमी कळताच तिसऱ्या मित्राचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. चंद्रकांत नगराळे (वय २८) आणि सुर्यदीप शिंदे (वय २४) आणि गोपाळ खंडाळकर (वय ४८) अशी या तीन मृतांची नावे आहेत.

औसा तालुक्यातील उजनी येथील विश्व हॉटेलमध्ये हे तिन्ही मित्र कामाला होते. टाका येथून चंद्रकांत नगराळे व सुर्यदीप शिंदे मोटारसायकलीवरून हॉटेलकडे निघाले होते. मात्र वाटेतच अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.

 

 

दोघांच्या मृत्यूची बातमी गावात पोहोचली आणि नातेवाईकांनी एक आक्रोश सुरू केला. या घटनेनंतर काही वेळातच चंद्रकांत व सूर्यदीप यांच्याबरोबर काम करत असलेल्या गोपाळ खंडाळकर यांचा त्यांच्या उजनी येथील घरी हृदयविकाराने मृत्यू झाला. एकाच दिवशी या तिघा मित्रांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्तकेली जात आहे. प्रत्येकाच्या तोंडून येत आहे.. मैत्री असावी तर अशी..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close